पीक उत्पादनवाढीची पंचसूत्री
“खरिप पीक लागवड करण्यापुर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी”
महाराष्ट्रात जूनअखेर सुरु झालेला पाऊस कोकण व जवळची काही जिल्हे वगळता २/३ आठवड्यानंतरही इतर जिल्ह्यात फारसा समाधानकारक पडलेला नाही. तेंव्हा जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय खरिप पिकांची पेरणी करु नये.
पिकांची पेरणी करण्यापुर्वी पीक उत्पादनवाढीची पंचसूत्री जाणून घेणे गरजेचे आहे.
१. जमिनीची पूर्वमशागतः
मध्यम ते भारी जमिनीत उन्हाळयात २/३ वर्षात खोल नांगरट व सुरवातीचा १/२ दुसरा पाऊस झाल्यानंतर जमिन भुसभुशीत होण्यासाठी पूर्वमशागत म्हणून १/२ वखरणीच्या पाळया दिल्यास खरिप पिकाची उगवण तसेच वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतात.
२. सुधारित बियाणांचा वापर व हेक्टरी रोपांची योग्य संख्याः
सुधारित व जास्त उत्पादन देणारे पिकाचे वाण खरेदी करुन जमिनीत पुरेशा ओलावा असताना पेरणी करुन हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखली गेल्यास खरिप पिकांच्या उत्पादनवाढीस मदत होते.
३. संतुलित खत व्यवस्थापनः
शिफारस केलेली रासायनिक खतांची मात्रा खरिप पीक लागवडीच्यावेळी न देता पीक चांगले उगवून आल्यानंतर २/३ आठवड्यांनी पिकात एकाचवेळी दिली तर पीक उत्पादनवाढीस मदत होते.
४. पाणी व्यवस्थापनः
पावसात मोठा खंड पडल्यास व १/२ पाणी उपलब्ध असल्यास ते खरिप पिकांना दिल्यास किमान १५ ते २०% उत्पादनात वाढ होते.
५. पीक संरक्षणः
पिकावर पडलेल्या रोग व किडींचे योग्यवेळी संरक्षण केले नाही तर पीक उत्पादनात ४०% पर्यंत घट येते तेंव्हा खरिप पिकाचेही पीक संरक्षण करुन उत्पादनातील ही घट टाळता येते.
This article would really helpful to the farmers.
Hearty congratulations to the author Dr.Deolankar Sir and Editor also
With best wishes.
From Dr.Avinash Kolage,
College of Agriculture, Muktainagar.
Thank You so much for visit to teatimenews.click