विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा

पालक व विद्यार्थी मित्रानो ,
आपण जर इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील घटक आहेत . तर हि योजना आपल्या साठी आहे . आपले पाल्य जर २०२५ मध्ये MHT-CET/JEE/NEET परीक्षा देण्याचा विचार करत आहेत तर तुम्हाला महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

या योजनेत कोण पात्र असतील ?

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
  3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
  4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी. 
  5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

यासाठी अर्ज कसा करणार त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक :

  1. 9 वी ची गुणपत्रिका
  2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
  3. आधार कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

यासाठी अर्ज कसा करावा.

  1. महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MHT-CET JEE / NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

4 thoughts on “Free Tab scheme of mah Gov.”
    1. या योजनेकरीता पात्रता पूर्ण असतील तर पोस्ट मध्ये लिहिलं आहे .त्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करा .

    1. क्रिमिनल नाही क्रिमिलियर असं आहे. रहिवाशी असा अर्थ आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *