चलन व्यापाराचे विश्व् …
एक महामारी आली , आणली असे हि म्हणता येईल . कारण हे कर्म मानवानेच केलेलं आहे . त्याचे दुष्परिणामही त्यालाच भोगावे लागतील. तसेच आता जसजसा मानवी बुद्धीचा विकास होतोय तस तस मानव आपल्या वेगळेपणाचे पर्याय निर्माण करीत आहे . त्यातूनच AI ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) म्हणता येईल असे पर्याय निर्माण करीत आहे . याचे अनेक पोटपर्याय आहे . त्यातून ब्लॉकचेंन , NFT ( नॉन फंजिबल ट्रांसकशन )आणि क्रिप्टो हा चलनी रुपये पैसे यांचा अदृश्य पर्याय आहे . हे सर्व मानवी प्रयोग आहेत . आता या बदल हे मानवी जीवनात खूप वेगवेगळे परिणाम करणारे आहे. एकदा का आपण चलनी पैशातून बाहेर पडलो की आपल्याला क्रिप्टो हे जागतिक चलन म्हणून स्वीकारवेच लागेल. अमेरिकेकडे डॉलरच्या किमती कमी झाल्यास किंवा ते जगाकडून अमान्य व्हायला लागल्यानंतरचा हा पर्याय निर्माण केला जात आहे. याला कुणी हे चलन निर्माण करायचे याला मर्यादा नाही. तेव्हा ज्याच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान असेल ते या चलनाचा बाजार मांडतील.
आता क्रिप्टो बाबत बोलू या.
हि डिजिटल व्यापार व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयोग जगभरातील बुद्धिजीवी लोक करीत आहे . सुरुवातील बिट कॉइन नावाचं एक डिजिटल चलन बाजारात आलं होत . त्याची रचना फार सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला होता . पण त्यातही चोरीचे पर्याय अन्य बुद्धिजीवींनी शोधून काढले. त्यासोबतच आता जवळपास आठवड्याला एक अशी हि डिजिटल चलन बाजारात येत आहे .पण खासकरून धनिक लोक आता यात पैसे गुंतवत आहेत.
भारतासह आशिया खंडात काय स्थिती आहे क्रिप्टो बाबत.
https://triple-a.io/crypto-ownership-india-2022/ या एका एजन्सीच्या सर्वेक्षणाने भारतात सुमारे ७.१० भारतीय यात गुंतवणूक केलेले आहेत . अर्थात आमच्या सरकारने याला चलन म्हणून मान्यता दिलेली नाही . हि मान्यता न देणारे एकटे भारत सरकार नाही . अजून या क्रिप्टोची सुरक्षितता सिद्ध होण्याला काळ जाणार आहे . संपूर्ण जगाचा विचार केला तर सुमारे चारशे तीस पेक्षा ज्यास्त मिलियन लोकांकडे क्रिप्टोची मालकी आहे . त्यापैकी एकट्या आशिया खंडातील जवळपास दोनशे साठ मिलियन नागरिकांकडे मालकी आहे . हे चलन म्हणून मान्य झाले तर यावर आपल्या खंडाची मालकी असेल.

आता कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल बुद्धिमत्ता यांच युग सुरू होत आहे. तेव्हा या दोन गोष्टी ज्यांच्या जवळ असतील ते सर्व जगावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतील. एकूणच आज मितीला तरी जगावर राज्य करायला आशिया खंड सज्ज आहे. विशेष म्हणजे या सर्व चढाओढीत व्हिएतनाम सारखा छोटासा देश साम्राज्य गाजवू शकतो. कारण वर्तमानात या देशाकडे जवळपास सहविस टक्के क्रिप्टो आहेत. ही बाब साधी नाही.