राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे चांगदेव मंदिर परिसरात साधारण आठ ,नऊ वर्षाची लहान मुलगी एकटीच बसलेली आढळली. मांडीवर दोन पाववडे घेऊन बसलेली बहुदा बोलत न येणारी चुकली किंवा तिला कुणी सोडून गेल . अशा संभ्रमात या ठिकाणी राहणारे नागरिक होते.

नेहेमीच्या सवयीनुसार पत्रकार मधू ओझा व सुदेश लोंढे हे या परिसरात संध्याकाळी फिरायला जातात. परिसरात राहणारे नागरिक व इथे देवदर्शनाला येणारे लोकानी ही मुलगी काही बोलत नाही. त्यामुळे तिच्या बाबत कुठलीच माहिती मिळत नसल्याचे सांगितले. इथे येणारा पैकी कुणी तरी तिला तिथूनच दोन पाव वडे खाण्यासाठी दिले तेही तिने आपल्या जवळ ठेवले होते. दरम्यान दीपक नवले विकी बाबा पूर्ण नाव माहीत नाही,महेश मुरुदगण,कैलास क्षीरसागर यांनी तीच नाव ,गांव विचारण्याचा प्रयत्न केला. पण तिला बोलत येत नसावे किंवा आपली भाषा कळत नसावी यामुळे तिने फक्त मान डोलवून प्रतिसाद दिल्याचे पत्रकार मधू ओझा यांना सांगितले.

तुम्ही काही तरी करा असे सांगितल्या नंतर ओझा यांनी राहाता पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांना मुलीचा फोटोया ठिकाणची माहिती दिली असता चव्हाण यांनी नागरिकांना आश्वासित केले की मुलीला आमच्या ताब्यात घेऊन शिर्डी येथील साई आश्रय आश्रमात पोहोच करून मुलीच्या पालकाविषयी काही माहिती मिळते का ते पाहू नाहीत तिला चाइल्ड लाइन अहिल्यानगर येथे पाठविण्यात येईल या वेळी चाइल्ड लाइन अहिल्यानगरचे स्वयंसेवकांना मुली बाबत माहिती कळताच त्यांनी पण मुलीच्या संरक्षण साठी सर्व प्रकारचे सहकार्य करू पण सध्या तुम्ही मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करा असे स्थानिक नागरिकांना सांगितले रात्री साडे नऊ ते दहा दरम्यान सरपंच स्वाती पवार,ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब मातंग,यांना सदर घटना कळताच त्यांनीही ग्रामपंचायत शिपाई धनवटे यांना पाठवून परिस्थितीची पाहणी केली.या कामात पुणतांबा येथील संदीप निकम,निलेश गायकवाड, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब कोरेकर,राजेंद्र बर्डे,होमगार्ड राहुल पर्हे,रिक्षा चालक अख्तर शेख यांचे चाइल्ड लाईनचे प्रवीण दरंदले, शाहिद शेख,प्रवीण कदम,कांबळे यांचे सहकार्य लाभले या सर्व घटनेतून एक बाब समोर येते ,ती म्हणजे खाकीत असलेला पोलिस हा एकमेव सुरक्षित पर्याय आहे. आणि त्यांनी ठरवले तर या चिमूरडीसह सामान्य नागरिकाच जीवन सुरक्षित राहू शकते.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *