कन्या माझी भाग्यश्री लाभ वाटप
पुणतांबा:महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशद्वारे लाभाचे वाटप करण्यात आले. पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्येकी पंचवीस हजार प्रत्येकी असे एक लाखाचे धनादेश पुणतांबा गावचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.ज्या घरात दोन कन्यारत्न आहेत अश्या पालकांना महिला बाल कल्याण विभाग अंतर्गत लाभाचे वाटप करण्यात येते.या योजनेचा सर्व स्तरातील पालकांनी लाभ उचलावा असे आवाहन डॉ.धनंजय धनवटे यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंगणवाडी सेविका नसीम कासम शेख यांनी केले.या योजने अंतर्गत धनश्री सोपान अजबे, भाग्यश्री सोपान आजबे,अमृता राहुल त्रिभुवन,कस्तुरी राहुल त्रिभुवन या कन्याच्या आईवडिलांना धनादेश सुपूर्द केले.या कार्यक्रमास सरपंच डॉ.धनंजय धनवटे,उपसरपंच संदीप धनवटे,सदस्य योगेश घाटकर,नितीन जोगदंड,अंगणवाडी सेविका शोभा मुरलीधर गावंगे,नसीम कासम शेख,वैशाली सुनील नाईक,मनीषा विलास जाधव यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार अंगणवाडी सेविका वैशाली सुनील नाईक यांनी मानले.
कशी आहे हि योजना ? कधीपासून सुरु झाली आहे ?
- 1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
- या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल
- या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000
- दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये
- 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ
- प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते
- मुदत ठेवींच्या निर्मिती साठी रु. 20 कोटी (आर्थिक वर्ष 2017-18) आणि रु. 14 कोटी रुपये (वित्तीय वर्ष 2018-19) वितरित करण्यात आले आहेत