साई मंदिर,शिर्डी श्री गुरुपौर्णिमा उत्सव
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी विणा घेऊन, तर मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व संस्थान संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त समाधी मंदिरात मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली.