संगमनेराची रणरागिणी झुंबरबाई अवसक ( शिंपी )
हनुमान जयंती म्हटलं कि ,महिलांनी हनुमानाचा रथ ओढला .हि बातमी पाहायला मिळते. इंग्रजांचा काळ होता. तेव्हाही हिंदू सणावर बंधन लादलेली होती. त्याचंच एक उदाहरण म्हणजे संगमनेरातील “हनुमान जयंती रथ मिरवणूक “ हि बंदी का लादली होती तर हा रथ एका मशिदी जवळून जात असे त्याचा मार्ग बदला नाहीतर हि रथ मिरवणूकच बंद असा फतवा तत्कालीन सरकारी न्याय दंडाधिकारी यांनी काढला होता. त्याला मोडीत काढीत हनुमान जन्माची रथ मिरवणूक परंपरा अबाधित ठेवणारी महिला म्हणजे “ झुंबरबाई शिंपी “
इंग्रज काळात जाऊ या . सण १९२७ -२८आणि १९२९ या तीन वर्षांचा कालावधी आहे. देशावर राज्य इंग्रजांचं होत पण त्यांचे कडे सरकारची सेवेत आमचेच लोक होते. संगमनेरातील हनुमान जयंतीचा रथ मिरवणूक ज्या रस्त्याने जात त्या मार्गावर एक भडंगबुवाची मशीद आहे. या मशिदी पासून हि मिरवणूक जाऊ नये म्हणून त्यावेळी नेमणुकीला असलेले सरकारी अधिकारी यांनी फतवा काढला. तो पर्यंत हि रथ मिरवणूक मशिदीजवळ जाऊन थांबली होती. सरकारने हा रथ मागे घेण्यास सांगितले त्याला अमान्य करीत संगमनेरकरांनी पाच दिवस तिथेच रथ थांबू दिला. व रथ यात्रा पूर्ण करूनच रथ मारोती मंदिरात आला. हि घटना १७ एप्रिल १९२७ पासूनच्या आठवड्याभराची आहे.

पुढच्या वर्षी १९२८ साली सरकारचा आदेश झुगारूनच हनुमान जयंती रथ मिरवणूक ५ एप्रिल १९२८ रोजी सुरु झाली. पुन्हा एकदा भडंगबुवा मशीद हेच निमित्त घेऊन सरकारने या मार्गावरून रथ नेण्यास बंदी घातली होती. पण यावेळी सरकारने हि रथ यात्रा सोमेश्वराच्या मंदिर जवळ रोखली होती. अर्थात हे सर्व इंग्रज सरकारच्या स्वतःच्या “ तोडा फोडा आणि राज्य करा “ या नीतीचा भाग होता. कारण रथ यात्रा या मार्गाने नेवू नये म्हणून कुठल्याही मुस्लिम व्यक्तीने आक्षेप घेतल्याची शासन दरबारी नोंद नाही.हे फक्त आपसातील द्वेष, वैरभाव निर्माण करावा या उद्द्येशाने हि नीती वापरल्याचे उघड होते. मग काय संगमनेरकरच ते रथ तिथेच थांबवला तब्बल दोन महिने ,लोक तिथे जात हनुमानाची पूजा करून दर्शन करून येत. “तोडा फोडा” नीती निष्क्रिय ठरली. सरकारने माघार घेत रथ यात्रा पारंपरिक मार्गाने पूर्ण केली
पुढल्या वर्षी म्हणजेच १९२९ साली सरकारने आपला हट्ट सोडला नाही.यावेळी धडक कार्यवाही , आपसात फूट पडण्याची नीती , श्रीमंत .गरीब ,अशिक्षित ,शिक्षित असे सर्व भेद शस्त्र वापरून हि रथ यात्रा त्यांना अपेक्षित मार्गानी वळवण्याचा प्रयत्न केला. हनुमान मंदिर परिसरात छावणीचा टाकली. आता १८ ,२० पुरुषांना रथ यात्रा काढायला बंदी होती, बाकीच्यांना जेल मध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या. आपल्या देशात आपल्या रूढी परंपरांना पायबंद घातला जातोय ही बाब कुणाही सामान्य नागरिकालाही संताप करायला भाग पडणारी होती. व हा संताप सकारात्मकतेत परिवर्तीत करून एक प्रचंड ऊर्जेचा दबाव निर्माण करणारी स्त्री म्हणजे “ झुंबरबाई शिंपी “ या बाईने पोलिसांचे कडे भेदून मारोतीची तसबीर रथात ठेवून या हनुमान जयंती उत्सवाची सुरुवात करून दिली. यात तिला साथ देणाऱ्या बंकाबाई परदेशी ,लीला पिंगळेसह अनेक मुली यांनी साथ दिली . यात कुठलीही भीती न बाळगता अगदी दंगल स्वरूपात रथ यात्रा पार पडली. पोलीस सैरभैर झाले. त्यांनी वाहने , त्यांनी निर्माण केलेले अडथळे हे भक्ती व परंपरेच्या वावटळीत कुठे उडून गेले याचा पत्ताही लागला नाही.

परिणामी इंग्रज सरकारने या रथाचा नाद करायचा नाही .हा धडा घेतला. आजही हि घटना समस्त संगमनेरकरांना प्रेरणा देणारी आहे. याचा प्रत्यय २०१० साली हि आपल्या म्हणजे स्वतंत्र भारतातल्या सरकारनेही घेतला आहे. गणपती विसर्जन करायला पाणी नव्हते म्हणून संगमनेरकरांनी गणपती विसर्जन थांबविले होते सरकारने पाणी सोडले तेव्हाच ते गणपती विसर्जन झाले . हा क्रन्तिकारी विचार रुजवणारी पहिली स्त्री म्हणजे “झुंबरबाई शिंपी “ या मायमाऊलीना शतशः नमन .

संदर्भ ; गोष्ट एका गावाची ,संतोष खेडलेकर यांच्या पुस्तकातून घेतले आहे.फोटो सौजन्य : श्याम तिवारी , नीलिमा घाडगे , काशिनाथ गोसावी.
