पोस्ट बँकेची आपोआप सेवा खंडित
पुणतांबा परिसरातील भारतीय पोस्ट पेमेंट बँक ग्राहकांची गैरसोय . सेवा अचानक बंद पडल्याने आर्थिक व्यवहार खोळंबले आहे. सर्व ग्राहक सेवा संपर्क नंबर बंद. स्थानिक पोस्ट कर्मचाऱ्यांना ग्राहकांची सेवा सुरू करून देणे अशक्य.
भारतीय पोस्ट पेमेंट बँक ही पोस्टाची स्वतंत्र डिजिटल बँके सेवा आहे. अलीकडे याच सेवे द्वारे लाडकी बहीण असो की शेतकरी सन्मान अशा योजणांसाठी नागरिकांनी ही बँक सेवा निवडली आहे. मात्र या डिजिटल सेवेचे तीन तेरा झाल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.
गेल्या आठवड्यापासून भारतीय पोस्ट पेमेंट बँकेची सेवा विस्कळीत झाली आहे. ही सेवा पुनः सुरू करण्यासाठी ग्राहकांना नव्याने नोंदणी करणे अपरिहार्य आहे. व ही नोंदणी आपल्या मोबाइलने करताना दोन संदेश दिले जात आहे. त्यानुसार

हा संदेश म्हणजे ढिसाळ आणि काल बाह्य तंत्रज्ञान याच उदाहरण आहे. एकीकडे आमचे सरकार सर्व व्यवस्था वायफायने जोडायला निघाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट पेमेंट बँक ही खाजगी मोबाइल कंपन्यांच्या भल्यासाठी असले फालतू प्रयोग करत ग्राहकांना सीम डेटा तसेच तेच सीम व नवनवे मोबाइल घेण्यास भाग पाडत आहे. अशा या व्यवस्थेवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
याच भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या नोंदणी प्रक्रियेतील आणखी एक मूर्खपणा म्हणजे ग्राहकाने पहिल्यांदा जारी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तरी असा संदेश तुमच्या मोबाइल स्क्रीनवर येतो. विशेष म्हणजे अशा वेळी संबंधित ग्राहकाने त्याचे आर्थिक व्यवहार कसे पूर्ण करायचे हा प्रश्न उभा राहतो.

एकूणच सध्या सरकारी व्यवस्थेचे नागरी सेवेच्या बाबत तीनतेरा वाजलेले आहे. महगुरू ,विश्वगुरु असले बिरुद लागून या वास्तविकेला नजर अंदाज करणे जनतेला परवडणारे नाही. आज मितीला राज्य असो की केंद्र सरकारच्या अनेक विभागांची अवस्था आंधळ दळते .. अशी झाली आहे . कळस म्हणजे या भारतीय पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या संकेत स्थळावर दिलेले एकही संपर्क क्रमांक हा सुरू नाही.