चोरीच्या वाळू साठ्यांचे पंचनामे सुरु, बांधकामाचेही पंचनामे होणार
चोरीची वाळू घेणारे महसूलच्या तडाख्यात सापडले. गेल्या दोन दिवसात महसूल विभागाने सुरु केलेल्या कार्यवाहीत कोपरगाव व राहता तालुक्यात केलेल्या साडे तीन हजार ब्रासचे वाळू साठे सापडले आहे. अशी कार्यवाही जिल्हाभर सुरु असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली.
राज्यसरकारने नागरिकांसाठी स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी सर्वत्र वाळूचे अधिकृत डेपो सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. अवघ्या सहाशे रुपये ब्रास एव्हढी नाममात्र किंमत आकारून डेपोतून देण्यास सुरुवात झाली आहे. असे असूनही चोरीची वाळू विकत घेणे व विकणे सुरूच आहे. यावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असल्याने सर्वत्र बेकायदा वाळूसाठ्याचे पंचनामे सुरु केले आहे. त्यासोबतच चोरीच्या वाळूने सुरु असलेली बांधकामे यांचेही पंचनामे सुरु केले आहे. हि मोहीम इथून पुढे सुरु राहणार असल्याचे मापारी यांनी सांगितले आहे.

दोन दिवसात राहता व कोपरगाव तालुक्यात केलेल्या एकशे एकोणचाळीस पंचनामे शिर्डी महसूल विभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालयाच्या संयुक्त कार्यवाहीची सुमारे साडे तीन हजार ब्रास वाळू साठ्यांचे पंचनामे करून पुढील कार्यवाही सुरु केली असल्याने चोरीची वाळू विकणारे व घेणारे दोघांचे धाबे दणाणले आहे.