साई मंदिर व परिसराच्या सुरक्षेत वाढ .
श्री साईबाबा संस्थानला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची सुरक्षा मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व संस्थान तदर्थ समितीचे मान्यतेने पुरविणेत येणार असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सांगितले. सी.आय.एस.एफ ची सुरक्षाबाबतची पी.आय.एल.मा.उच्च न्यायालयात प्रलंबीत असल्याने, तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) यांची सुरक्षा संस्थानचे मंदिर व मंदिर परिसरातील पाचही गेटवर राहणार असुन, भक्तनिवासस्थाने, साई प्रसादालय इत्यादी ठिकाणी सुरक्षा पुरविणार आहे. त्यासाठी ७४ सुरक्षा कर्मचा-यांची तुकडी संस्थानला सुरक्षा देणेबाबत करार झालेला आहे. त्याकामी संस्थानला दरमहा रक्कम रूपये २१ लाख इतका खर्च येणार असुन, ०२ जूलै पासून श्री गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) यांची सुरक्षा तैनात होणार आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) यांचे सोबत जिल्हा पोलीस-१०० कर्मचारी , संस्थान कायम व कंत्राटी कर्मचारी असे एकुण ६०० सुरक्षा कर्मचारी संस्थाच्या मंदिर परिसर व इतर विभागांना सुरक्षा देणार आहे.
हि अतिरिक्त व्यवस्था आहे का ? आणि असेल तर याची गरज का पडली आहे ? याबाबत पी सीवा शंकर यांच्याशी संपर्क न झाल्याने याबाबत खुलासा होऊ शकला नाही .