श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थानात गुढीपाडवा उत्सव साजरा…
कथाकार गणपत महाराज लोहाटे यांची उपस्थिती…
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान (गांवठाण,सराफ बाजार, कोपरगाव),महादेव देवस्थान (संजीवनी पार जवळ,बेट-कोपरगाव),गंगेश्वर महादेव ( जेऊर कुंभारी,ता.कोपरगांव) या कोपरगाव तालुक्यातील तीनही महादेव देवस्थानात गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला आहे.
कोपरगाव शहरातील सोमेश्वर महादेव देवस्थानात कथाकार ह.भ.प. गणपत महाराज लोहाटे आणि सौ. कमलताई गणपतराव लोहाटे यांचे शुभहस्ते सोमेश्वर महादेवास अभिषेक, पुजा आणि आरती करण्यात आली आहे.

सोमेश्वर महादेव देवस्थानला प्रसिद्ध व्यापारी श्री. निरजजी नरेंद्रजी डंबीर यांनी नव्याने अर्पण केलेल्या ताम्र अभिषेक पात्राचे पुजन करण्यात आले. तसेच स्व.नाना पाटणकर परिवाराकडून घड्याळ बसविण्यात आले आहे.
गुढीपाडवा निमित्ताने रांगोळीकार शितलताई लोंढे यांनी रांगोळी साकारली.केळीचे पान व फुलांचे तोरण बांधण्यात आले.सनई, मंत्रोच्चारात गुढीचे पुजन करून उभारण्यात आली.
कथाकार महादेव देवस्थानचे प्रमुख श्री. महेंद्रजी(बाळासाहेब) पाटील, सौ. संगिताताई पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुशांतजी घोडके यांचे शुभहस्ते मानाची, टोपी, उपरणे, शाॅल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे श्री.जयंतजी विसपुते,पौरोहित्य श्री. प्रदिपशास्री पदे,श्री.प्रशांतस्वामी जंगम,श्री.नंदूजी शेंडे (गुरव) यांनी केले. महादेव मंदिर बेट येथे अॅड. शांमजी मुंदडा, श्री. तुषारजी आव्हाड, श्री. मच्छिंद्रजी सोनवणे, श्री. विलासजी गोंदकर, श्री. मच्छिंद्रजी सोनवणे, श्री. विजयजी वाघमारे (गुरव), गंगेश्वर महादेव, जेऊर कुंभारी येथे श्री. पाटीलबा वक्ते,श्री.चंद्रकांतजी जोर्वेकर, श्री.नाना गुरसळ, अक्षय गुरसळ यांचे सह भाविक उपस्थित होते.
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे महादेव देवस्थान वतीने दाते पंचांग नुसार सण-उत्सवाचे वार्षिक नियोजन जाहीर करुन नवं वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.