महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील बाल गायक जयेश खरे च्या गाण्याची रसिकांना भुरळ…🎤
सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांची बालगायक जयेश खरे सोबत सदिच्छा भेट…
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांजुळपोई या गावातील बाल गायक जयेश विश्वास खरे याने “महाराष्ट्र शाहीर” या मराठी चित्रपटात गीतकार गुरू ठाकूर यांच्या “गाऊ नको किसना” या रचनेला गायले आहे.संगीत रचनाकार अजय-अतुल यांनी हे गीत संगीतबध्द केले आहे.
बाल गायक जयेश खरे “चला हवा येऊ द्या” कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्यासाठी रवाना झाला. त्यास सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सदिच्छा भेटीत शुभेच्छा दिल्या आहेत.या प्रसंगी जयेशचे वडील विश्वास खरे उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील करजगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात जयेश ६ वी ईयत्तेत शिकतो. वयाचा ४ वर्षाचा असल्यापासून गायनाची आवड आहे. त्याचे वडील विश्वास हे ही उत्तम गायक आहेत.

काही महिन्यांपूर्वी शाळेत गाणं गुणगुणत असतांना मुलांनी ही बाब राठोड सर यांना सांगितली.त्यांनी जयेशला गायला सांगुन त्याचे चित्रिकरण फेसबुकवर सार्वजनिक केले…त्याला रसिकांनी पसंती दिली. गीत संगीतातील लोकप्रिय जोडी अजय अतुल यांनी दखल घेत “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली…प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे यांचा “महाराष्ट्र शाहीर” हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होतो आहे.त्या आधिच चित्रपटातील जयेश याने गायलेले “गाऊ नको किसना” हे गीत रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.
“जय जय महाराष्ट्र माझा…”हे स्फुर्ती गीत महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात नेणारे… १९४२ चले जाव चळवळ, गोवा व हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अशा आंदोलनात सहभागी झालेले…महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आदरभावाने गौरविलेले…भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले लोकशाहीर किसनराव (कृष्णाराव) साबळे यांचे सह शाहीरांच्या जीवनावर आधारित ” महाराष्ट्र शाहीर ” या चित्रपटातील गाणे गाण्यासाठी बाल गायक जयेश खरे याची निवड म्हणजे त्याच्या गायकीचा भाग्योदय म्हणावा लागेल…