कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने पत्रकारचा गौरव
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विलास बडे यांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिसरातील पत्रकारांना भेट वस्तु देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष व कोपरगावचे लोकप्रतिनिधी आशुतोष काळे, उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,सचिन चांदगुडे,राहुल रोहमारे,वाल्मिक कोळपे,बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव आदीसह कोपरगाव,राहाता तालुक्यातील पत्रकारासंह मान्यवर उपस्थित होते.
https://dainik.bhaskar.com/lfAtkvdw7Pb: पत्रकारांनी आपले नख आणि दात सांभाळावे लागतील.विलास बडेत्यावेळी पुढे बोलताना विलास बडे यांनी एक म्हातारा आणि वाघाची प्रबोधन करणारी गोष्ट सांगून आज पत्रकारांनी आपले काम करत असताना आपली विश्वास अहर्ता व स्वाभिमान जपण्याची गरज आहे. त्यासोबतच आज ”पत्रकारिता ए.आय. च्या उंबरठ्यावर उभी आहे . रोज नवनवे बदल होत आहे. गेल्या शतकात जे बदल झाले नाही ते अवघ्या दशकात झाले आहे. नवीन पिढी स्मार्ट झाली आता पत्रकार या झपाट्याने होत असलेल्या बदलाला सामोरे जाण्यास तयार आहे का? असे सांगताना वाघ आणि शेतकऱ्याच्या मुलीचे उदाहरण देऊन पत्रकारांनी आपले नख आणि दात सांभाळावे लागतील असा इशारा दिला आहे.
https://www.aajtak.in/india/chhattisgarh/story/chhattisgarh-19-arrested-in-the-murder-case-of-parents-and-brother-of-aaj-tak-journalist-santosh-toppo-ntc-rpti-2141178-2025-01-11: पत्रकारांनी आपले नख आणि दात सांभाळावे लागतील.विलास बडेगेल्या काही दिवसपूर्वी बिजापूरतील पत्रकार मुकेश चंद्रकार या भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांची हत्या होत आहे ही चिंतेची बाब आहे.त्याबाबत संघटित होण्याची गरज आहे.पत्रकारांना दात आणि नखे दाखविण्याची वेळ आली आहे. कधीही झाले नाही अशी राज्यात राजकीय परिस्थिति आहे. आज राज्यात विरोधी पक्ष नसल्याने आपल्याला जनतेच्या वतीने सरकारला प्रश्न विचारवेच लागतील. तसेच पत्रकारांवर हल्ले होत आहे. आपले सहकारी जीव गामावत आहेत. त्यावर आपण प्रत्येकाने आपल्या परीने आवाज उठवला पाहिजे हे अत्यंत पोट तिडकीने सांगितले.

पत्रकारांना आपली गुणवत्ता वाढवावी लागणार आहे तरच आपण आगामी काळात टिकू शकणार आहे. पत्रकारांच्या आर्थिक स्थितीवर अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडत आज पत्रकारांना आता मान आणि धन मिळत नाही.याची कोणी दखल घेणार आहे का असा रास्त सवाल त्यांनी केला आहे. व पत्रकारांना राजाश्रय देण्याची गरज आहे .कारण पत्रकारिता राहिली तरच सामान्य नागरिकांना न्याय मिळू शकतो.भारताचा तालिबान होऊ द्यायचा नसेल तर पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे आवाहन सर्व समाजा समोर असल्याचे मत मांडले.
सदर प्रसंगी पत्रकार बडे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या कर्मवीर काळे सहकारी साखर कारखानदारीच्या कामाचे कौतुक केले असून आमच्या नजीकच्या कारखाने बंद पडत असता व राज्यात अनेक ठिकाणी ही विकासाची बेटे लयाला जात असताना काळे यांनी सहकारी साखर कारखानदारी जिवंत ठेवली असल्याबद्दल अभिनंदन करीत आशुतोष काळे यांना शुभेच्छा देत, आपल्यासारख्या शिक्षित राजकीय तरुण नेतृत्वाकडून समाजाला खूप अपेक्षा आहेत. असे कौतुकही केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर प्रस्ताविक सोमनाथ सोनपसारे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी मानले आहे.