चित्रकार रवी भागवत, निवेदक प्रसन्न धुमाळ यांना कलारत्न पुरस्कार

श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उम्मती फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा कलारत्न पुरस्कार या वर्षी सुप्रसिद्ध चित्रकार रवी भागवत व सुप्रसिद्ध निवेदक प्रसन्न धुमाळ यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
शहरातील नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंतराव जमधडे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन दिवाणी न्यायाधीश निवास खराडे, न्यायाधीश प्रियांका पटेल, परीक्षाविधीन न्यायाधीश आसिया शेख उपस्थित होते. तसेच करियर मार्गदर्शनासाठी डॉ. योगेश पुंड, प्रा.जलाल पटेल, वैभव ढूस आदी मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. यावेळी शहरातील सामाजिक एकता, बंधुत्व व शांतता कायम राहावी या प्रामाणिक उद्देशाने मौलाना इर्शादउल्लाह कासमी, ह.भ.प.कृष्णानंदजी महाराज, ग्यानी अनोखसिंग मिस्कीन, फादर ज्यो गायकवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांच्या संकल्पनेतून श्रीरामपुर शहरातील विविध क्षेत्रातील 28 आयडॉल्स यांना समाजरत्न, शिक्षणरत्न, आरोग्यरत्न, कलारत्न, पत्रकाररत्न, रक्षारत्न, अध्यात्मरत्न अश्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रकार भागवत यांनी चित्रकलेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गुरू चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रांच्या माध्यमातून गरजू रूग्णांना लाखो रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. शिवाय एड्स जनजागृती, व्यवसमुक्ती, वीज बचत, पाणी बचत, हुंडाबळी, वाहतुक नियमन आदी सामाजिक विषयांवर त्यांची राज्यभर असंख्य चित्र प्रदर्शने भरली आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत फाऊंडेशनच्यावतीने त्यांना कलारत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपजिल्हा रूग्णालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र विभागाचे समुपदेशक, उपजिल्हा जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सुप्रसिद्ध निवेदक धुमाळ यांनी एड्स जनजागृती, सर्वरागे निदान शिबिरांचे आयोजन, रूग्णालयाच्या माध्यमातून रूग्णांना ट्रस्टची मदत मिळवून देणे, कारोना काळात विशेष लसी करण सत्राच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी शिबीरे आयोजित केली आहेत्त. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक वकील.आरीफ शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. तौफिक शेख यांनी केले. सुत्रसंचालन प्रसन्नन धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युसूफ लखाणी, असलम सय्यद, फिरोज पठाण इरफान शेख, शाकीफ शेख, इसाक शेख, फारूक मेमन, नितीन बनकर,डॉ. सुदर्शन रानवडे, डॉ.अहतेशाम शेख, शाहरुख बागवान, अलीम बागवान, माजिद मिर्जा आदिनीं परिश्रम घेतले

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *