लोकप्रतिनिधीच्या कार्यालयाने देखील केले दुर्लक्ष
पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता गृहांची दुरवस्था झाल्याने अंतर रुग्ण सेवा बाधित झाली आहे.परिणामी महिला आणि पुरुष दोन्ही रुग्ण एकाच वॉर्ड मध्ये दाखल करावे लागत आहे. याबाबत रुग्णालयाने कोपरगाव सार्वजनिक बांधकाम कडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे.त्याला या मुजोर व्यवस्थेने कचराकुंडी दाखवली.
दरम्यान लोकप्रतिनिधी आशुतोष काळे यांचे कार्यालयाला देखील रुग्णालय प्रशासनाने संपर्क केला त्यांच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकामाला पत्र दिले. वास्तविक पाहता यांच्या कार्यालयाने या समस्येवर तोडगा काढण्यातही तत्परता दाखविणे अपेक्षित होते असे असताना त्यांनी सा. बा कडे जाण्याचा मार्ग सांगून आपली सोडवणूक करून घेतली . एकूणच या सर्व पाठपुरावा आणि पत्रव्यहाराला कचरा कुंडी दाखविल्याचे दिसून येते.
राज्य सरकार गतिमान असल्याची ग्वाही यांचे पालक मंत्री वरचेवर देत असतात. अशा गतिमान सरकारात आरोग्य सेवा बाधित होते याचे गांभीर्य कुणाला आहे असा प्रश्न नागरिकाना पडल्याशिवाय रहात नाही. याच प्रश्नावर teatimnews ने सुमारे दीड वर्षापूर्वी आवाज उठवला होता. त्यावर कोपरगाव सार्वजनिक बांधकाम फक्त पाहणी करून गेले. त्याला सहा सात महीने लोटले असतील. आरोग्य सेवेच्या बाबतची उदासीनता ही सरकारात असंवेदनशील लोकांची भर्ती असल्याचे उघड होते.
teatimenews ने दीड वर्षापूर्वी म्हणजेच मार्च 2024 ला या समस्येवर लक्ष वेढण्याचा प्रयत्न केला होता. https://teatimenews.click/gov-health-service/ या बातमीने इथे डॉक्टर कमतरता दूर झाली. आजमितीला डॉक्टर आहे. कर्मचारी पुरेसे आहे. पण अंतर रुग्ण दाखल करून ठेवणे कठीण आहे. कारण स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आहे. याशिवाय इथे ऑपरेशन थिएटर आहे, डॉक्टर आहे. पण रुग्णाला दाखल करून घेण्यासाठीची सोय नाही.
