कोपरगावात पवार विरुद्ध पवार मुख्य लढत
अहिल्यानगर जिल्हयातील कोपरगाव विधान सभेत प्रमुख लढतीत पवार विरुद्ध पवार असे चित्र आहे. अर्थात आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे असून त्यांना महायुतीने म्हणजेच एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस , अजित पवार या मुख्यमंत्री युतीने उमेदवारी दिली आहे . तर शरद पवार , उद्धव ठाकरे , आणि इंदिरा कॉंग्रेस यांचे उमेदवार म्हणून संदीप वर्पे यांना उमेदवारी दिली आहे. संदीप वर्पे हे शरद पवारांचे जवळचे कार्यकर्ते आहे.
याशिवाय याच मतदार संघात अपक्ष उमेदवार असलेले संजय काळे या सामाजिक कार्यकर्त्याने मतदार संघात खेडोपाडी आपला प्रचार सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात या तीनही उमेदवारांचा प्रचार मतदार गाठी भेटी , त्यांच्या अडचणी समजून घेण्याचे काम सुरू झाल्याचे दिसते.
मविकाचे उमेदवार यांनी कोपरगाव शहरातून आपला प्रचार सुरू केला आहे. ऐन दिवाळीत फटका दुकांनदारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संदीप वर्पे यांनी वेळ दिला आहे. त्यांनी समक्ष फटका स्टॉल वर जावून या दुकानदारांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू असे आश्वासन देत त्यांचे सोबत सेल्फी घेतल्या आहेत.

दुसरी कडे एकला चलो रे चा नारा देत अपक्ष उमेदवार यांनी आज पुणतांबा परिसरात आपली मतदार भेट मोहीम राबवली आहे.
