नगर मालेगाव या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून कोपरगाव ते देवळाली प्रवरा हा पर्यायी मार्ग निर्माण केला. या मार्गावर असलेले संडे ,शिंगवे ,पुणतांबा ,गोंडेगांव , खैरी-निमगाव ,बेलापुर यासह अनेक छोट्या गावाना या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. हा राज्यमार्ग क्रमांक छतीस कोपरगाव , राहाता,श्रीरामपूर अशा तीन तालुक्यातून जातो. कोपरगाव व श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. पुणतांबा येथून कोपरगावकडे या महामार्गाचे काम नेहमीच निकृष्ट दर्जाचे राहिले असल्याने या परिसरातील नागरिकाना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

पुणतांबा गावातून जाणार हा राज्यमार्ग क्रमांक 36 हा रेल्वे फटकाच्या पुढे म्हणजेच सा. बा श्रीरामपूर हद्दीत चांगला आहे. व कोपरगाव कडे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. हे खड्डे इतके मोठे आहेत की त्यावरून जाणाऱ्या मोठ्या गाड्यांचेही नुकसान निमूटपणे नागरिक सहन करत आहे.लोकप्रतिनिधीच लक्ष नसल्याची चर्चा करीत तक्रार करणेच सोडून दिले आहे. एकाच मार्गावरील एकाच सरकारच्या दोन हद्दीत झालेल्या कामाची तुलना नागरिक करत असतात. ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात येत नाही का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोपरगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांनी कोपरगाव संगमनेर रस्त्याच्या कामाची कैफियत विधानसभेत मंडळी होती, त्यात दोषी ठेकेदारवर कार्यवाही साठी ते आग्रही होते, याचे कौतुकही नागरिकानी केले. असे असताना राज्य मार्ग 36 वर मौन का हा सवाल या भागातील नागरिक करत आहे.

या रस्त्याच्या बाबत आर.बी. चौधरी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव दिवाळी नंतर पडलेल्या खड्यांची डागडुजी करण्यात येणार आहे असल्याचा खुलासा केला आहे .आजवर या रस्त्यावर डागडुजी करण्यात जे पैसे खर्च झाले त्यात हा रस्ता चांगला आणि पूर्ण झाला असता . तसेच समृद्धी महामार्ग वर केलेल्या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी एम.एम.आर.डी. ए या विभागाची असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत भ्रमणध्वनी द्वारे सूचित केले आहे.त्यांचा अजून प्रतिसाद नाही.पुन्हा एकदा आमचे वरिष्ठ अधिकारी याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

पुणतांबा गावातून जाणारा राज्य मार्ग 36 या कोपरगाव राज्य मार्गाच्या निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. दिनांक 28 सप्टेंबर रोजी झालेल्या एकाच पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे यातला भ्रष्टाचार हा निसर्गानेच उघड केला आहे. हा राज्यमार्ग कोपरगाव विधान सभेचे आशुतोष काळे यांच्या मतदार संघात येतो. अहिल्यानगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यातील हे गांव आहे.या दोघांच सरकार आहे ,जवळीक आहे. असे असूनही दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणी नुसार पुणतांबा गावच्या ग्रामस्थांची अवस्था झाली आहे.

पुणतांबा चौफुली ते पुणतांबा हा रस्ता म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय ठरलेला आहे . अशातच यावर समृद्धी महामार्गाचा बोगदा हा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अकलेचे दिवाळे काढणार आहे. योग्य ऊंची न घेतल्याने यावरील बोगद्यात समृद्धी सुरू होण्याच्या आधीच ट्रक अडकला होता. त्यावर पर्याय म्हणून एम एम आर डीच्या विद्वानांनी याची खोली वाढवली खरे पण या राज्य मार्गाला एक पायरी करून ठेवली. हीच पायरी आजमितीला अपघात व वाहनाच्या नुकसान करत आहे. या खड्यामुळे सरकारी अधिकारी,लोकप्रतिनिधी एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?

एका पावसात रस्त्याचे तीनतेरा वाजवले असून आता या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती कधी व कोण करणार अशी चर्चा वाहनचालकात असून असे काम करणारे अधिकारी,ठेकेदार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दीपक वाटेकर(वाहन चालक,मालक)पुणतांबा कोपरगाव हा रस्ता काम होऊन एक वर्ष पण झाले नाही एकाच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली आहे.गेल्या दहा ते पंधरा वर्षानंतर या रस्त्याचे काम झाले होते आता परत किती वर्ष रस्त्याच्या कामासाठी वाट पहावी लागणार.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *