राज्यसह देशभरात अतिवृष्टि झाली , यात राज्यात झालेल्या नुकसान भरपाई ही दिवाळी पूर्वी देण्याचा प्रयत्न करत असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही पैसा जमा झाला. पण आज दिवाळी सुरू झाली. पण कुठलेली अनुदान किंवा विम्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी झाली आहे.

देशात आणि इतिहासात सर्वात ज्यास्त मोठे नुकसान भरपाई पॅकेज जाहीर केले. या सर्व घोषणा या कासावगतीने पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे आज दिवाळीला सुरुवात झाली. आज दूसरा दिवस आहे. अजून ही कृषि अधिकारी हे तुमची खतेफोड झाली नाही. तुमचे एकाच खात्यात पैसे देण्यास हरकत नाही अशी फाजील स्वयं घोषणापत्र घेण्यात व्यस्त आहे.

या सर्व लिंक या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया पेज वरुण घेतल्या आहे. या तारिखवार आहेत.

देवाभाऊ , तुम्ही अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि परीक्षण करून निर्णय घेत असले तरी आपली व्यवस्था ही तुमच्या घोषणेच्या गतीने काम करू शकत नाही. त्याचे एकच कारण आहे . ते म्हणजे या व्यवस्थेत कुठल्याही अधिकारी , कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित नाही . त्यामुळे घोषणा या घोषणाबाजीत परावर्तित होतात आणि व्यवस्था मात्र जनतेला वेठीस धरण्यात कुठलीच कसर सोडत नाही. यावर गंभीरतेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *