“कापूस पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन”
कपाशीच्या बीटी वाणांचे अन्नद्रव्य् व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे हे या वाणांपासून जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बीटी वाणांची अन्नद्रव्यांची गरज नेहमीच्या संकरित वाणांपेक्षा साधारणपणे सव्वा पट असल्याने संकरित वाणांसाठीच्या अन्नद्रव्यांच्या शिफारशी सव्वापट प्रमाणात बीटी कापसासाठी वापरावयास हरकत नाही.
बागायती संकरित कापसासाठी लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५० किलो पालाश (८६ किलो म्यूरेट ॲाफ पोटॅश), लागवडीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) व पुन्हा लागवडीनंतर ६० दिवसांनी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) प्रति हेक्टरी दयावे.
कोरडवाहू देशी वाणांसाठी लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी १२.५ किलो नत्र (२७किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २५ किलो पालाश (४३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश), लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रति हेक्टरी २५किलो नत्र (५४ किलो युरिया) द्यावा आणि बोंडे वाढीच्या काळात २ टक्के (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) युरियाची पिकावर फवारणी करावी.
कोरडवाहू संकरित वाणांसाठी लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी २० किलो नत्र (४३किलो युरिया), ४० किलो स्फुरद (२५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४०किलो पालाश (६९ किलो म्यूरेट ऑफ पोटॅश), लागवडीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र (87 किलो युरिया) द्यावा. बोंडे वाढीच्या काळात २ टक्के (१० लिटर पाण्यात १००ग्रॅम) युरियाची पिकावर फवारणी करावी.
हेक्टरी द्यावा.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .