एस एम देशमुख यांच्या फेसबुक भिंतीवरून
मा. नितीनजी गडकरी यांनी परिषदेच्या कार्यक्रमास येऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसलेल्यांना पुन्हा एकदा मुखभंग झाला.. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण एवढंच की, मराठी पत्रकार परिषदेचा कार्यक्रम जाहीर झाला रे झाला की तो हाणून पाडण्यासाठी लष्कर कामाला लागते.. नियोजित पाहुणे कार्यक्रमास येऊच नयेत म्हणून हरतऱ्हेने प्रयत्न केले जातात.. परंतू पोटदुखयांना यश कधीच येत नाही… कारण त्यांचा सामना एका देशमुखाशी असतो… आणि हा देशमुख हार कधी मानत नाही.. हे अनेकदा सिध्द झाले असले तरी मंडळी वारंवार आपला कंडू शमवत राहते..
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा तोच प्रयोग केला गेला माझ्या आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करणारया पोस्ट फिरविल्या गेल्या, मा. नितीनजी गडकरी यांना पत्र पाठवून त्यांनी माझ्या कार्यक्रमास येऊ नये म्हणून आग्रह धरला गेला.. कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी जे करता येईल ते सारं केलं गेलं..

फिर भी मै हार नही माना..
माझे सर्व सहकारी, टीम मुंबई जिद्दीने कामाला लागलो.. आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करून दाखविला.. मुंबईत पत्रकारांचे आजपर्यंत जे कार्यक्रम झाले, त्यातील सर्वात आखीव, रेखीव, देखणा नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणून आजच्या आमच्या कार्यक्रमाची नोंद होईल..आम्हाला अभिमान आहे याचा…
नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार.. कुठल्याही विरोधाला, आमच्याबददलच्या अपप्रचाराला भीक न घालता ते कार्यक्मास आले.. दिलखुलासपणे बोलले.. त्यांनी आपल्या भाषणातून मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी करीत असलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली..आम्हाला आणखी काय हवं होतं?
धन्यवाद नितीन गडकरी साहेब, आम्ही आपले शतश:श्रुणी आहोत..
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे सहकार्य तर आम्हाला नेहमीच लाभते.. अत्यंत कमी अवधीत त्यांना विनंती केली आणि ते आले त्यांचेही मनापासून आभार..प्रकाश जोशी आणि सर्व पुरस्कारयर्थींचे आभार यासाठी की, त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार केला.. सर्व पुरस्कारथींमुळे आमच्या पुरस्कारांची पत आणि प्रतिष्ठा वाढली..
दिल खूष हुऑ..