राहाता तालुक्यातील मोठे क्रांतिकारी ,दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पुणतांबा गावच्या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिति अत्यंत हलाखीची झाली आहे. जवळपास चार कोटीची कर वसूली थकल्याचे कर्मचाऱ्यांचे पगार होणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अनिल नळे या ग्रामपंचायत सदस्याने आपले दोन वर्षात मिळणारे मानधन हे ग्रामनिधीत जमा करून ग्रामपंचायत प्रशासनाला हातभार लावला आहे.
नळे यांच्या या मदतीने एखाद्या कर्मचाऱ्याची दिवाळी साजरी होऊ शकते. सतरा सदस्य असलेली पुणतांबा ग्रामपंचायत अनेक अनियमित आणि वसुली बाबत सुस्त असल्याने कर्मचाऱ्यांचे आठ ,दहा महिन्याचे वेतन थकलेले आहे. गावासाठी दोन पाणी पुरवठा योजना आल्या. त्या सुमारे पस्तीस कोटीच्या आहेत. त्यांची वाट लागली आहे. परिणामी आज ही गावकारी पिण्याचे पाणी विकत घेऊन पित आहे. तसेच वापरण्यासाठी या चौकशीस पात्र दोन पाणीपुरवठा योजना फेल गेल्याने कर्मचारी वसुलीसाठी कुठल्या तोंडाने फिरायचे या संकटाला सामोरे जात आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्नाची साधने कुठलीही निर्माण करण्याच्या दृष्टीने कधीही प्रयत्न केलेल्या नाही. याउलट ग्रामपंचयातीच्या मालकीच्या रिकाम्या जमिनीवर अतिक्रमणे करणारणा पाठीशी घातले जात आहे.

अनिल नळे हाडाचे शिवसैनिक असून समाजाच्या उपयोगी पडणे,गरजूच्या पाठीशी सतत उभे राहण्याची मानसिकतेचे शिवसैनिक आहे. ते ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून लोकांचे पंचायतीच्या कामाचा पाठ पुरावा करण्यासाठी स्वखर्चाने तालुक्याला जाणे , पाठपुराव्यात सातत्य ठेवणे अशी कामगिरी बजावली आहे. नळे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांना मिळणारे दोन वर्षांचे मासिक मानधन हे सुमारे पाच हजार एव्हढे ग्रामनिधीत जमा करावे असे पत्र दिले आहे.आता नळे यांचे अनुकरण किती सदस्य करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
