आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
जग बदलत आहे . झपाट्याने आपण सारे संगणकीय विज्ञानावर विसंबून राहण्याचे प्रमाण आता गतीने वाढत आहे .अलीकडच्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता हि एक डिजिटल संपत्ती आहे . नव्या आधुनिक जगाची एक कार्य पद्धती आहे .
या कृत्रिम बुद्धिमतेचे फायदे हे आता यादीने मोजावे लागतील . किंबहुना प्रत्येक मानवाला याचा वेगवेगळं अनुभव येत राहणार आहे . मानवी जीवनाला हे उपयुक्तही ठरणार आहे . यामुळे आरोग्यसेवा ही अगदी वेदनामुक्त होतील. आयुष्यमान वाढण्याला मदत होतील. रोगांचे निदान अगदी पहिल्या स्टेजला किंवा संभावना झाली कि होईल . हा आरोग्याचा फायदा आपल्याला मिळेल . दळणवळण गतिमान होईल . यासारखे अनेक फायदे आहे.
या कृत्रिम तोटेही समोर येऊ लागली आहे . त्यातला खूप मोठा जनसामान्य यासाठी तोटा हा आर्थिक बाबतीत होणार आहे .
ai चा वापर गुन्हेगारीत सुरू झाला आहे
तो व्हॉइस क्लोनिंग ( आपला आवाजाची कॉपी ) करून आपल्या नातेवाईकाला फोन करून पैसे मागणी करणे . असे प्रकार घडण्यास सुरुवात झाली आहे . यासोबत फोटो ,व्हिडीओ हे ही क्लोन करून त्याचा दुरुपयोग सुरु झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत .
यातून सुटका वा फसवणूक व्हावी यावर सावधगिरीचा उपाय :
सांगणारा हा व्हिडीओ बघा .
हा माझा चॅनेल आहे . आपण याला सबस्क्राईब करा.
या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आता बिगारी कामासाठी केला जातोय . अगदी सामान्य कलाकारांचे काम व कौशल्य याने धोक्यात आल आहे . आता रोबोट विठा थापायला मदत करत आहे. अगदी तंतोतंत मिस्त्री काम करत आहे. बांधकाम , सुतार काम , यातील कलाकुसरीचे कामही सहजतेने हे करीत आहे .
नव्या जगाच्या जीवन पद्धतीत आता आपल्याला नव्या गुन्हेगारी विश्वाचा परिचय असणे गरजेचे झाले आहे. आता ai चा वापर जसं जसा वाढत जाईल. तसा गुन्हेगारीचा पॅटर्न देखील बदलणार आहे. तेव्हा आपण सावध असणे म्हणजे सुरक्षित असणे हा मंत्र जपत रहा.