आरक्षण,तीन अपत्य,पट्टीची थकबाकी आणि दमछाक
गावची निवडणूक सुरु आहे .उमेदवारी अर्ज दाखल करणायची मुदत संपली. प्रक्रिया सुरु झाली, नेत्यांपुढे उमेदवार शोधण्याचे संकट गडद झाले. त्यात आरक्षण व तीन अपत्य यांनी चांगलीच दमछाक झाली. आजवर फक्त स्वतःसाठी मतदार म्हणून विचार केलेले वर्गातून उमेदवार शोधायचा हे जरा कठीणच होत. पण घटनात्मक तरतुदीने हि जादू घडवून आणली. म्हणून फुले,शाहू,आंबेडकरांचं नाव घेऊन भाषण ठोकणं आणि प्रत्यक्ष कृती करणं हि मोठी सत्व परीक्षाच आहे. याची जाणीव झाली. शेवटच्या दिवशी विहित मुदतीत इच्छुकांच्या अर्ज संख्येने शंभरी गाठली. याचा सुखद अनुभव कुणाला मिळाला तर ग्रामपंचायतीला. त्यांच्या कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी एखादे दुसरे थकीत वेतन होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मित्रानो ,थकबाकी पोटी ग्रामपंचायतीची डिड लाख रुपये पाणी पट्टी ,तर पाच लाख रुपये घरपट्टी वसूल झाली. आजमितीला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वीस बावीस महिन्यांचे पगार थकलेले आहे. बहिदा हे कर्मचारी घरचे श्रीमंत असतील. कदाचित नोकरी जाण्याच्या भीतीने हे सर्व सहन करीत आहेत. हे जर माहित करून घ्यायचं असेल व हा गलथान कारभार थांबवून या कर्मचाऱ्याचे वेळच्यावेळी पगार होण्यासाठी काही करायचे असेल तर तिथे निवडून जावे लागेल. असं आमच्या ग्रामस्थांना अजिबात वाटत नाही. म्हणूनच तर हे निवडणूक लढायला घाबरतात. व हे आपलं काम नाही म्हणून मागे राहतात.
असो यंदाच्या निवडणुकीत घरपट्टीची विक्रमी वसुली झाली. साठ सत्तर लोकांनी एव्हढी प्रचंड घरपट्टी का ? थकवली असेल. जरावेळ हे सर्व याच निवडणुकीची वाट पाहत होते. असं समजू मग हे लोक कधी ग्रामसभेत दिसले नाही. आणि ग्रामसभेत नेहमी बोलणारे याबाबत कधी बोलले नाही. अचानक या लोकांना गावासाठी खूप काही करण्याची मानसिकता झाली. याबद्दल त्यांच कौतुक केलं पाहिजे. त्यासोबत हे आपण आपल्याला विचारले पाहिजे. कि खरोखर हे लोक गावासाठी काही करतील कि यांची पट्टी भरणारासाठी मूग गिळून बसतील. तो जे सांगेल त्यात आपली सहमती नोंदवतील.
माझी गावातील प्रत्येक उमेदवाराला विनंती आहे , त्यांनी निवडणूक लढताना जिंकून आल्यावर आपल्या वार्डात काय काम करण्यासाठी आपण उमेदवारी केली आहे. हे सांगावं.नेमके कुठले काम करण्यासाठी निवडणूक लढली आहे हे सांगावं.त्याच्या या कृतीचे स्वागत असेल.
हि निवडणूक खास आहे. महिला आरक्षण आहे. अनुसूचित जाती ,जमातींना संधी आहे. त्यांनी त्यांच्या उद्धारासाठी सरकार ज्या योजना राबवते त्या सर्व पारदर्शक व प्रामाणिकपणे राबवून घेतल्या तरी त्यांच्या निवडणूक लढण्याचे सार्थक होईल. त्यासोबत सत्तेची मक्तेदारी हि कुण्या एका विशिष्ट वर्गाची जाती जमातीची नाही हे दाखवून देण्याची संधी या निवडणुकीने मिळाली आहे.
जरा विचार करा. बिड्या ,गुटके ,दारूसाठी दिवसाला खर्च करता त्यातून पाच रुपये जरी बाजूला टाकले तरी तुमची नळ पट्टी ,घरपट्टी कुणी संधी साधूंनी भरण्याची गरज पडणार नाही. त्यांचं ऐकून त्यांच्या साठी काम करण्याची गरज पडणार नाही.
वंदे मातरम
माधव ओझा ,पत्रकार ,पुणतांबा @९९६०००४२५८