मी अपक्ष अर्ज भरणार आहे. तुम्ही हि भरा.
पुणतांबा ग्रामस्थांनो
नमस्कार
मी माधव ओझा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. दोन दिवसापूर्वी आपण निवडणूक का लढायची यावर खुलासेवार लेख सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याची दखल आपण सर्वानी घेतली आहे. हा लेख नाशिकचे निर्भय पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे यांचे पर्यंत पोहचला. त्यांना आपली संकल्पना आवडली आहे.त्यांनी तुमच्या प्रचारासाठी मी पुणतांबा येथे येईल असे आश्वासनही दिले आहे. माझी संकल्पना अपक्ष उमेदवारांची संख्या वाढविण्याची आहे. असे हि मी त्यांना सांगितले आहे. तरीही हि आपल्या गावातील कुणाला त्यांच्या पार्टीच्या वतीने उमेदवार उभे करण्याची मानसिकता असले तर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.जितेंद्र भावे यांचे फेसबुक पेजवर भेट देऊन त्यांचे काम कसे आहे हे तुम्ही पाहू शकता.
मी आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक याअपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे. तुम्ही देखील लढा . निवडणुकीला पैसे लागतात. हा गैरसमज दूर करण्यासाठी लढा. ज्यांना पैसा खर्च करून निवडणूक लढायची आहे. ती त्यांची पद्धत आहे. खुशाल लढू देत त्यांना. आपल्याला त्या दुष्टचक्रातून हि व्यवस्था बाहेर काढायची आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून करू या .
आपण आपलं फक्त डिपॉझिट भरून निवडणूक लढायची आहे.
दुसरं महत्वाचा मुद्दा आजवर स्थानिक राजकारणी हे त्यांचे पॅनल उभे करतात. त्याला काय त्यांचे पैसे खर्च करतात का ? अजिबात नाही . त्यांना ते वरुन येतात. म्हणजे ज्यांनी मतदार व हि व्यवस्था आपल्या मालकीची असावी असा निर्धार करून राजकारण हा पेशा स्वीकारला आहे. ते हे पैसे देतात. अर्थात त्यांचा हा धंदा आहे. त्यात ते पैसे गुंतवतात. त्या मोबदल्यात त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. आपण आपलं फक्त डिपॉझिट भरून निवडणूक लढायची आहे. जर आपल्याला खरोखर गावासाठी वेळ द्यायचा आहे. प्रामाणिक काम करायचं आहे. तर पैसे देऊन जाहिरात करून मत का मागायची ?
गावकऱ्यानो , आजवर स्थानिक लोकांनी सदस्य,सरपंच हे लादलेले आहे. सर्व ग्रामस्थांना वारंवार ऐकिवात येणारी गोष्ट म्हणजे उमेदवाराचे घरपट्टी नळपट्टी भरावी लागते , ती स्थानिक नेते भरतात. आणि त्या नागरिकाला उमेदवार म्हणून उभे करतात. अहो ज्याची ग्रामपंचायतीचे कर भरण्याची मानसिकता नाही असे नालायक लोक सत्तेत आपण का पाठवतो ? खरोखर एखादा उमेदवार गरीब आहे. हा अपवाद सोडता येईल .पण ज्यांनी या संधीसाठीच ग्रामपंचायतीचे कर थकवलेले असतात. अशा लोकांच्या हाती गावची सत्ता सोपविणे बंद करा. जे स्वतःची नळपट्टी ,घरपट्टी भरत नाही. त्यांनी उमेदवारी करणं हे संधीसाधूपणाच लक्षण आहे. तर अशा लोकांना उमेदवारी देणं हे किती मूर्खपणाच उदाहरण असू शकत. याच कारणांनी हे लोक सत्तेत येऊनही गावच्या समस्यांवर मूग गिळून बसतात. प्रसंगी ज्यांनी याना निवडणूक लढण्यास आर्थिक मदत केली ते लोक गावच्या रस्ते ,पिण्याचं पाणी , दळणवळण या अडचणींकडे दुर्लक्ष करतात. अनेक राजकीय नेते जाहीरपणे मतदारांना पैसे देण्याची कबुली देतात. .
उमेदवार हा शिक्षित स्वतःच्या पायावर उभा असलेला का शोधत नाही हि मंडळी ?
पुणतांबा गावच्या इतिहासात पहिल्यांदा सरपंच पद हे अनुसूचित जमाती महिला असणार आहे. मुळात या वर्गात येणारी उमेदवार महिला हि गरीबच असणार आहे. तरीही आज गावच्या कर आकारणी नुसार घरपट्टी तीनशे ते चारशे रुपये व पाणी पट्टी हि सातशे वीस असा एकूण तीन साडेतीन रुपये रोज कर आहे. कि जो घरावर लावलेल्या डिश टीव्हीच्या रिचार्जपेक्षा कमी आहे. हि पहिलीच वेळ आहे. या भावनिक कारणांची झालर लावून या उमेदवाराचे थकीत कराचे पैसे स्थानिक नेते भरतील. पण का ? तर ग्रामपंचायत आपल्याच मर्जीने चालावी म्हणून.या पदावरचा उमेदवार हा शिक्षित स्वतःच्या पायावर उभा असलेला का शोधत नाही हि मंडळी ?
अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. हा लोकजागर आहे. मी अपक्ष अर्ज भरणार आहे. तुम्ही हि भरा. निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर लोकशाही प्रगल्भ करून भ्रष्ट व्यवस्था भ्रष्टाचार व प्रामाणिक करण्यासाठी, हा आपला प्रयत्न आहे. त्याला यशस्वी करणे तुमच्या हाती आहे. आपण आपल्या ग्रामपंचायतीपासून सुरुवात करू या .
वंदे मातरम .
माधव ओझा ,पत्रकार ,पुणतांबा @ ९९६०००४२५८