ज्यांना आम्ही विश्वस्त म्हणून निवडून दिले त्यांनी लोकशाहीच्या या पायावरच घाव घातला आहे.
समस्त पुणतांबेकरांनो ,
नमस्कार ,
आज आपल्या गावात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरु आहे . काळे ,कोल्हे ,विखे हि तीन प्रमुख नावं आहेत. कि जे आजी माजी मंत्री आहेत. या मंडळींचे प्रतिनिधी आपल्या गावातील निवडणुकीचे प्रतिनिधित्व करीत आहे. हा लोकशाहीचा भाग आहे. असं म्हटलं जात. दिवाळीच्या तोंडावर या निवडणूक आहे. तेव्हा मतदारांची निवडणूक गोड होणार, एक दिड कोटी रुपये चलन पुणतांबा गावात बरसणार आहे.अशीही चर्चा सुरु आहे.
अशा परिस्थितीत उमेदवार व मतदारांची मानसिकता काय आहे ?
आरक्षणामुळे याना आपली गरज पडली आहे, आपली थकीत पट्टी भरून होते आहे. हारलो काय आणि जिंकलो काय याच्याशी काही देणे घेणे नाही . जिंकलोच तरी काही करायचे नाही. कारण आपली थकीत पट्टी ज्यांनी भरली आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात फक्त “ होयबा “ एव्हढंच झालं आपलं काम.आहे अशी उमेदवाराची मानसिकता आहे. त्याच्या विचारांची गती आणि व्याप्ती किती छोटी आहे. असे लोक गावाचा विकास साधू शकत नाही.
मतदार म्हणून लोकांना काय वाटतंय , पैसे देणारा हा वेगळा आहे. आपण पैसे घेतले तरी यादीत नाव आहे. आणि नाही घेतले तरी यादीत नाव आहे. तर मग का सोडायचे ?अर्थात अलीकडे तर अगदी मतदार गणिक पैसे वाटा त्या हिशोबाने पैसे येतात. चांगले चांगले घेतात मग आपण का नाही स्वतःची अशी ही स्वतः ची समजूत काढून या फसव्या प्रक्रियेत सहभागी होतो. व याला मिळालेल्या हजार पाचशे रुपयात न कळत गुलामी मान्य करतो व अपमान सहन करतो.
आपला गट अबाधित राहावा म्हणून फक्त निवडणुकीत भाषण ठोकायला येणारे लोकप्रतिनिधी नंतर गावात पाच वर्ष हे फक्त चांगल्या रस्त्याने गावात येतात.ते फक्त आपल पॉकेट जसच्या तस आहे कि नाही हे तपासायला येतात. याचा गावाला काय फायदा होतो. उत्तर आहे शून्य. कारण त्यांचे प्रतिनिधी हे अहोरात्र यांची पार्टी जगवण्यासाठी झटत असतात हि राजकारणाची रीत आहे. आमचे तीन नेते धनंजय जाधव ,धनंजय धनवटे , मुरलीधर थोरात हे आमच्या निवडणुकीचे किंग मेकर आहे. सत्ता आपल्या कडेच असावी म्हणून यांचे तिघांचे इमानदारीने प्रयत्न सुरु आहे.
मित्रानो , अशी व्यवस्था तुम्हाला काय देते
आता एक ठरवा , दोन दशकापासून आपल्या गावाला शुद्ध पिण्याचे पाणी नाही. गाव मुख्य प्रवाहापासून दूर फेकलं गेलं आहे. या आपल्या नेते मंडळींची ऊर्जा आपल्या गावासाठी कशी उपयोगात आणता येईल ? आज आपलं दळणवळण विस्कळीत झालं आहे. वाकडी रस्त्याचे काम कुठवर आले ? रामपूरवाडी, न पा वाडी शिवारात शेत असलेले ग्रामस्थांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता आहे का ? बंधाऱ्याकडे जाणारा चांगला रस्ता आहे? अहो बाजारात जाण्यासाठी ,स्मशानात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का ?…. इतर सर्व रस्ते बघा काय अवस्था आहे. फक्त रस्ते आणि पिण्याचे पाणी हा मुद्दा आहे.
जो पर्यंत तुम्ही यांचे पैसे घेऊन यांना घराचा रस्ता दाखवणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही बदल घडवू शकणार नाही नेहमी गुलामीत जीवन जगण्यात सुख शोधणार आहेत. तुमच्या पुढच्या पिढ्या इथे राहायला येणार नाही. कारण त्यांनी इथे राहावं यासाठी तुम्ही कधीही काहीही केलेलं नाही.
माधव ओझा ,पत्रकार @ ९९६०००४२५८