पर्यावरण दिनानिमित्त साईप्रभानगर येथे वृक्षारोपण…
वाढते तापमान रोखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्वाचा आहे. पर्यावरण प्रेमी परिसरातील नागरिक समुहाने एकत्र येत श्रमदान आणि स्व-खर्चाने वृक्षारोपण पालकत्व कार्य कौतुकास्पद असून अशी प्रेरणा नागरिकांनी घेऊन वृक्षारोपण कार्यात व्यापक सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले.
कोपरगांव येथील साईप्रभानगर येथील रहिवासी यांनी मोकळ्या जागेत संभव्य महादेव मंदिर परिसरात फुलझाडे लावण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करून पालकत्व दिले. या प्रसंगी मुख्याधिकारी सुहास जगताप, महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके साईप्रभानगरचे संतोष वाकचौरे, बापुनाना जाधव, माजी सैनिक साहेबराव शेजवळ, प्रवीण वाघ, सुनील दळवी, रोहित देशमुख, प्रवीण मुंगसे, सागर मुंगसे, मनोज भांगरे, श्रीकांत माळी, मनोज बारे, रामदास उंबरकर, पुंडलिक लोखंडे, सचिन वाघ, सुमन जाधव, मीरा वाकचौरे, जयश्री मुनसे, वैशाली वाघ, मिनल भांगरे, अनिता माळी, अश्विनी दहे, मयुरी दळवी, कविता बारे, दीपाली मुंगसे, सुनीता देशमुख, उर्मिला उंबरकर यांचे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
साईप्रभानगर येथे मोकळ्या जागी पाच वर्षापूर्वी लावलेली कडूलिंबाची झाडे मोठी झाली आहे. आज बेल, लिंब, वड, करंज, गुलमोहर यासह पर्यावरण पूरक देशी झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले.
सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून स्वच्छता – जलशक्ती – वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम सोबत अनेक ठिकाणी वृक्षारोपण आणि पालकत्वाचे अभियान लोकसहभागातून विविध ठिकाणी यशस्वी केले आहे.
या प्रसंगी,देशी झाडांचे वृक्षारोपणातून पर्यावरण समतोल पूर्ववत आणून पक्षी-वन्यजीव यासह सजीवांचा नैसर्गिक परिसर सर्वांनी टिकवावा. असे आवाहन महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी आज येथे केले.