श्री.गो.विद्यार्थ्यांचा प्लास्टिक बाटलीत कचरा संकलनाचा अभिनव उपक्रम…
सूर्यतेज संस्था वतीने स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी दखल घेत केला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आंब्याचे रोप देऊन सन्मान…🌱🥭
कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे छोटा कचरा संकलनाचे कार्य व स्वच्छतेचे बाल संस्कार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी केले.
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटणी, आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानित संगिता मालकर यांचे मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना घर व परिसरातील लहान आकाराचा प्लास्टिक कचरा प्लास्टिक बाटलीत एकत्र करून संकलन अभियान सुरु केले आहे. सुमारे २५ बाटली कचरा संकलन केले. या कृतीची दखल स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी घेतली. सूर्यतेज संस्थेच्या वतीने यांचे सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कुर्लेकर यांचे शुभहस्ते सन्मान केला. याप्रसंगी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थींनी प्लास्टिक बाटलीत संकलित छोटा प्लास्टिक कचरा नगरपालिकेकडे सुपुर्द केला जाणार आहे.कचरा संकलनाची प्रेरणा इतरही शाळेच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी. तसेच आंबा कोई पासून रोप तयार करून रोपे तयार करावी. तसेच विविध झाडांच्या बियांचे संकलन अभियान राबवावे.असे आवाहन वनश्री सुशांत घोडके यांनी केले आहे.शाळेतील विद्यार्थी यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे…