पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ३० जूनपर्यंत मुदतवाढ
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ
डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन
अहमदनगर, दि.१३ जून (जिमाका वृत्तसेवा) -दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज व २०२१-२२ चे नोंदणीकृत केलेले अर्ज रिअप्लाय करण्यासाठी अर्ज प्रक्रियेस ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.