पंचायत समिति ,मंठा येथील गलथान प्रकार.
लोकशाही कारभारात लोकप्रतिनिधी हे विश्वस्त तर प्रशासकीय , शासकीय कारभार चालवणारी व्यवस्था ही जनतेची व सरकारची नोकर आहे. अलीकडे ही नोकरशाही बेबंद झाली आहे. जनतेची मालक होवू पाहता आहे. त्याला कारण ज्याना जनतेने विश्वस्त म्हणून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे या नोकरशाहीला पाठीशी घालून आपला आणि आपल्या डाव्या उजव्या चमच्याच कल्याण करण्याला आपले कर्तव्य मानून कारभार चालवत आहे.
परिणामी जनतेवर मोर्चे काढून , आंदोलने , उपोषण करून ,शिक्षित लढा असेल तर माहिती अधिकार वापरुन न्याय मागण्याची वेळ येत आहे.
मराठवाड्यातील बाळासाहेब खवणे या तरुणाने एक लोकजागर मोहिम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील या तरुणाने आपल्या मित्रासह ग्रामसेवकांनी मुख्यालयी निवास करावा म्हणून सुरुवातीला अर्ज देवून आपला लढा सुरू केला. स्वतः शिक्षित असल्याने कनिष्ठ,वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून ही कागदी लढाई सुरू केली.तसा पाठपुरवा करण्याचे काम सुरू असताना अनेक नवनव्या भानगडी समोर येऊ लागल्या यातून जिल्हा परिषद , पंचायत समिति या व्यवस्थेचे नेमके अस्तित्व काय आहे ? तसेच ही व्यवस्था किती व कशी प्रभावशून्य आहे. या व्यवस्थेत किती , अनास्था आहे हे समोर आल. यातूनच आपल्या पाठपुरव्याला वरिष्ठ कार्यालय फक्त पत्र , स्मरण पत्र काढूनअर्ज कर्त्यांची समजूत काढण्याला आपले कर्तव्य समजत आहे.
पाठपुरावा करून कुठलीच कार्यवाही होत नाही म्हणून संबंधित मुजोर ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे मुद्यावर खवणे यांचे सहकार्याने आमरण उपोषण सुरू केले. त्याची तब्येत खालवल्याने या उपोषण कर्त्यांस उपचारार्थ हलविण्यात आले. यावर रीतसर अर्ज ,निवेदन देऊन जालना जिल्हयातील मंठा पंचायत समिति समोर धरणे उपोषण सुरू केले. त्यांचेच समोर शेतकरीही विहीरीच्या नोंदी , मंजूरी अशा मुद्यांना घेऊन उपोषणाला बसले होते. या दोन्ही उपोषणकडे सरकारच्या कुठल्याच व्यवस्थेने लक्ष दिले नाही.
पंचायत समिति समोर दोन उपोषण सुरू आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध माहितीनुसार गट विकास अधिकाऱ्यांची मुलीच्या लग्नाला पंचायत समितीचा संपूर्ण कर्मचारी वर्ग गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित उपोषण कर्त्याने सोशल मिडियात सार्वजनिक केलेल्या विडिओ, फोटोने मराठवाड्यातील वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्था ही रामभरोसे असल्याचे हे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे पंचायत समोरच धरणे आंदोलन सुरू असल्याने आंदोलनकर्त्याने सार्वजणीक केलेल्या फोटोवर आजची तारीख आणि वेळ स्पष्ट दिसत आहे.






जिथे नेत्यांना जनता देव मानू लागते तिथे नोकरशाही ही जनतेचे मालक होण्यास वेळ लागत नाही. त्याच सोबत ” TeaTimeNews” जबाबदारी निश्चितीचा कायदा करण्यासाठी आग्रही असेल. जो पर्यन्त या नोकरशहावर जबाबदारी निश्चित केली जाणार नाही तोपर्यन्त हे जनतेचा मालक होण्याची संधी कधीच सोडणार नाही.
आजच्या या घटनेत पंचायत समिति ,मंठा येथील सर्व कर्मचारी साहेबाच्या घरी लग्नाला जावून मनमानी पद्धतीने सामूहिकरित्या कामकाज बंद ठेवणार असतील तर वरिष्ठ कार्यालयाने यावर काय कार्यवाही याकडे परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे.