पुणतांबेकरांचा रेल्वे कडून होणारा छळ काही केल्या थांबेना.
रेल्वे प्रशासनाच्या मनमानीचे बळी ठरलेल्या पुणतांबेकरांचा छळ काही केल्या थांबेना . देशवासीयाकडून दिवसाला तीन कोटीची लूट करणारे रेल्वे प्रशासनाने पुणतांबा जंक्शनवर रेल्वेला थांबा ,आरक्षण,तिकीट विक्री , सुरक्षित अंडर पास अशा विविध मागण्यासाठी केलेल्या रेल रोको आंदोलनात लाखोचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत मोजक्या वीस ग्रामस्थावर आकस धरून आरोपपत्र दाखल केले.या सर्व कथित आरोपीनी स्वतः मनमाड लोहमार्ग न्यायालयात हजर होवून जामीन देवून सुटका करून घेतली आहे.
दरम्यान पूर्वीचे सोलापूर विभागीय कडे असलेल्या पुणतांबा जंक्शनवरून शिर्डी येथे रेल्वे लाइन टाकण्यात आली आहे. आता हे जंक्शन पुणे विभागीय व्यवस्थापक इंदु दुबे यांच्या अधिकारात येते. यांना ग्रामस्थानी रेल रोकोचा इशारा देणारा ग्रामसभेचा ठराव वीस दिवस आधी पाठवूनही दुबे यांच्या यंत्रणेने पुणतांबा ग्रामस्थांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याला रेल्वेचे स्थानिक व्यवस्थापक , त्यांचा गुपवार्ता विभाग हेही तितकेच जबाबदार आहे. परिणामी पुणतांबेकरांना हे आंदोलन करण्यास रेल्वे विभागाच्या मनमानीने भाग पाडले.

महामारीच्या संकटापूर्वी याच जंक्शन वर दिवसभरात दहा बारा प्रवाशीगाड्या सुरू होत्या , तिकीट विक्री , तिकीट आरक्षण हे सर्व आलबेल सुरू होते. या सर्व सुविधा कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केल्याने अवघ्या परीसराला याची झळ बसू लागली.देशभर रेल्वेचा विकास सुरु आहे. पण हाच विकास पुणतांबा परीसारसह दौंड मनमाड रेल्वे मार्गावर अवलंबून असलेल्या सुमारे पाचशे ते सातशे गांव , वाड्या ,वस्त्या यांच्या मुळावर उठला. या नागरिकांचे स्वस्त ,सुरक्षित दळव वळण अचानक बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले. लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न गंभीर झाला. अर्थात हा अनुभव पुणतांबा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारा होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठीचे सर्व पर्याय ग्रामस्थानी अवलंब करून पहिला. रेल्वे प्रशासन कशालाच जुमानत नाही. रेल्वे प्रशासनाच्या दुष्ट चक्रातून बाहेर पाडण्यासाठी ग्रामस्थानी विशेष ग्रामसभेत रेल रोकोचा ठराव घेतला.त्याच्या प्रती रेल्वेच्या सर्व संबंधीतसह , जिल्हा पोलिस अधीक्षक , जिल्हाधिकारी , स्थानिक पोलिस ठाणे , पुणतांबा स्टेशन मास्टर यांना देण्यात आले. परिसराच्या लोकप्रतिनिधिना या सर्व प्रश्नाचे काही देणे घेणे नसल्याने या अडचणी सोडविण्यासाठीची इच्छाशक्ती येणार कुठून ?
रेल्वेचा कायदा स्वतंत्र आहे. याचा अर्थ असा नक्कीच नाही, तुम्ही त्याचा वापर सामान्य नागरिकांवर करावा. अर्थात हा कायदा इंग्रजांनी बनवलेला आहे. त्यांनी स्वतः त्याचा कधी गैर वापर केला नाही. याउलट त्यांनी सामान्य जनतेच्या सोय सुविधाना प्राधान्य दिले होते. आमच सरकारच यांच्याशी प्रामाणिक नाही. त्यामुळे ही मनमानी ,छळवाद निमूटपणे सहन करणारे पुणतांबा ग्रामस्थांवर अन्याय करणे हा अधिकार , हक्क असल्यासारख पुणे विभागीय व्यवस्थापक , विभागीय रेल्वे सुरक्षा बल या दोन्ही महिला अधिकारी वागत आहे.
साध्या अर्जापासून ते रेल्वे मंत्र्यांच्या भेट या पाठपुराव्याच फलित म्हणून पुणतांबेकरांना दोन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळाला.पण रेल्वे मंत्र्यांची भेट घेतल्याचा आकस धरून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी संपूर्ण गावांवर गुन्हे दाखल करा असा फतवा काढून आपले कर्तव्य बजावणारे अधिकारी हे वीस दिवस आधी ग्रामस्थानी रेल रोकोचा इशारा दिला होता. तेव्हा काय करत होते ? ग्रामस्थांनी आंदोलन केले नाही तर या हुकुमशाही व्यवस्थेने त्यांना ते करावयास भाग पाडले आहे. याची जबाबदारी निश्चित होणे , चौकशी होणे हे लोकशाहीत अपेक्षित आहे.
काल रेल्वे प्रशासनाने आरोपी ठरवलेले वीस ग्रामस्थ स्वतः मनमाड येथे सेंट्रल रेल्वे न्यायालय मा. न्या मुक्कनवार यांचे न्यायालयात हजर राहून रेल्वेने केलेले आरोप नाकारून हा दावा चालविण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचे वतीने तिथेच उपस्थित असलेले वकील पाटील यांनी जमीनाची कार्यवाही पूर्ण केली.रे सू बळाचे निरीक्षक विजय शिंदे ,सचिन आव्हाड यांनी आरोपपत्रात आरोपीना कुठलीही कल्पना न देता या सर्वांकडून वीस लाख रुपये नुकसान वसूल करण्यासाठीचा उल्लेख केल्याने सर्व आरोपीना संकटात टाकले होते . असे असताना नांदगावचे लोकप्रतिनिधी सुहास कांदे यांचे समर्थक सिध्दार्थ छाजेड. अजिंक्य साळी यांनी निस्वार्थ भावनेतून वीस आरोपीना जामीन झाले .
रेल्वेने ठरवलेल्या आरोपित एक डॉक्टर , एक पत्रकार , चार व्यापारी , दोन मजूरी करणारे ,दोन शिक्षक यांचेसह दहा शेतकरी यांचा समावेश आहे. त्यांची नावे अशी आहे. धनंजय जाधव, डॉ धनंजय धनवटे, सर्जेराव जाधव, सुहास वहाडणे, विजय धनवटे, महेश कुलकर्णी, अमोल सराळकर, गणेश बनकर,माधव ओझा,बाळासाहेब चव्हाण, भुषण वाघ,शाम धनवटे,अनिल नळे,चंद्रकांत वाटेकर. अरूण साळुंके.चांगदेव राजगुरू. पटारे ,कोकाटे , जालीदंर पवार.जगदीश गगे.अशी आहेत. लोकशाही व व्यवस्था यांच्यावरच विश्वास उडवणारा असल्याचा हा अनुभव आहे .या वाईट प्रसंगात रामभाऊ पवार.अक्षय सोमवंशी, दत्ता दुसाने आंदोलकांच्या पाठीशी उभे होते.