आणखी एक दशकाने पुणतांबा कुठे असेल हा प्रश्न इथे राहणारे गावकरी नागरिकाने व गावच्या भरवशावर राजकारण करून सत्तेचा मलिदा खाणारे प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची ही वेळ आहे . अर्थात हे गांव फार प्रतिभा संपन्न आहे. ऐतिहासिक, पौराणिक, क्रांतिकारी आहे. ही सर्व बिरुद मनाला दिलासा देणार आहे. तरीही वास्तव हे अस्वस्थ करणारे आहे.

पण वास्तव काय आहे ? इथे लोकांच्या पोस्टात , बँकांत ठेव पावत्या आहे. मूल बाहेर पडून पैसा कमावत आहे . इथे जुने घर आहे. अलिकड त्यात नवे पण आल आहे. जुने वाडे मोडकळीस आले. यांच्याकडे पुढची पिढी नव्याने आकर्षित होईल का हा प्रश्न मला पडलेला आहे. याच गावातून आज सुमारे सत्तर ते ऐंशी मूल ही विदेशात आहे. त्यासोबत दीडशे ते दोनशे मूल ही देशातल्या मोठ्या शहरात आहेत. वर्क फ्रॉम होम करणारे पन्नास साठ मुले मुली आहे. गावची आजची लोकसंख्या पाहिली तर साडे तेरा ते पंधरा हजाराच्या आसपास शिल्लक आहे. अनेक नागरी समस्यानी स्थलांतरित होण्याने गावची लोकसंख्या निम्मी झाली असे हे पुणतांबा गांव आहे.

या गावातून अनेक नामवंत व्यक्तित्व शिक्षित झाले ,कलाकार झाले.शतका पूर्वीची मराठी प्राथमिक शाळा आहे. या शाळेवर राजकीय बोकयांची नजर आहे. ही पाडून ही जागा कशी बळकावता यासाठी जीव तोडून प्रयत्न सुरू आहे. आज मितीला शाळकरी मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या ही विलक्षण कमी झालेली आहे. याबाबत गावकऱ्यांना अजिबात चिंता नाही. माजी सरपंचांनी सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुमारे सातशे विद्यार्थी आहे. तर श्रीरामपूर , राहाता , कोपरगाव येथे इंग्रजी माध्यमात शिकायला जाणारे सुमारे दोनशे विद्यार्थी आहेत. ही एव्हढी संख्या गावातील रूरल हायस्कूल या एक शाळेची माध्यमिक पर्यन्तची होती. त्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सुमारे आठशे ते हजार विद्यार्थी ही नव्वदच्या दशकापर्यंत शिकत होते. सत्तर ते ऐंशी च्या दशकात जीवन शिक्षण देणाऱ्या मराठी मुले शाळेत जवळपास पाचशे व मुलींच्या शाळेत जवळपास आठशे ते हजार विद्यार्थी पहिली ते सातवी साठी होते . आज या दोन्ही शाळा मिळून जेमतेम तीनशे एव्हढे मूल ,मुली शिकत आहे. अभिमानाची बाब म्हणजे ही मराठी शाळा विद्यार्थी संखेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यार्थी संख्या घटली म्हणजेच या गावात राहानदार ( निवासी ) नागरिक यांची संख्या घटली आहे. हा बदल गावकरी मान्य करायला तयार नाही.

एकोणविसशे ऐंशीच दशक हे पुणतांबा गावाच्या सुबत्ता आणि विकासावर घाला घालणारे ठरले. याच दरम्यान शेती महामंडळ,चांगदेव शुगर मिल या दोन संस्था बंद पडल्या . यांचा परिणाम गावच्या बाजारपेठेवर खूप मोठ्या प्रमाणावर झाला. रोजगाराचा प्रश्न आणखी गडद होत गेला. परिणामी नागरी स्थलांतर सुरू झाल. या बदलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल. आपल राजकारण सुरू आहे. ते अबाधित रहाव म्हणून थोड्या प्रयत्न करून सत्ता टिकवणे ही कार्यपद्धती स्वीकारून राजकारण सुरू झाल यात गावासाठी रोजगारची निर्मिती हा मुद्दा निवडणुकीसाठी वापरला . अलीकडे तोही संपला आहे. कारण यांच्याकडून कुणालाच अपेक्षा उरलेली नाही.

आज मितीला आशा केंद्र या आरोग्य संस्थेच्या निमित्ताने गावातील शे सव्वाशे कुटुंबाला रोजगार मिळालेला आहे. या व्यतिरिक्त गावात रोजगारची उपलब्धता नाही. केंद्र सरकारच्या कामगार किट नोंदणीचे शंभर लाभार्थी आहेत. त्यात खरे कामगार जेमतेम वीस पंचवीस असावे. आज तरी कुणीही गावात रोजगार निर्माण व्हावा यासाठी काही करताना दिसत नाही. या सर्व परिस्थितीकडे फाजील सकरात्मकतेने पहिले तर आम्ही सारे स्वयंपूर्ण आहोत असे म्हणता येईल.

क्रमश:

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *