गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा

आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०७.०० वाजता संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.मिनाक्षी सालीमठ यांच्‍या हस्‍ते गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली.

श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्‍थान मंदिरात संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मिनाक्षी सालीमठ यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सौ.कावेरी जाधव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *