श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी घेतले,

श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

credit: (News & Photo – SSST, SHIRDI)

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने बुधवार दिनांक २९ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ याकालावधीत साजरा करण्‍यात आलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
राहुल जाधव म्‍हणाले, श्री रामनवमी उत्‍सव मोठया उत्‍साही वातावरणात पार पडला असून या उत्‍सवकाळात साईभक्‍तांकडून श्री साईबाबा संस्‍थानला विविध माध्‍यमातुन भरभरुन देणगी प्राप्‍त झाली आहे. यामध्‍ये दानपेटीतून ०१ कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ७६ लाख १८ हजार १४३, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे ०१ कोटी ४१ लाख ५२ हजार ८१२ रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने १७१.१५० ग्रॅम (रुपये ०८ लाख ६४ हजार ७२३) व चांदी २७१३ ग्रॅम (रुपये ०१ लाख २१ हजार ८१३) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध मार्गाने एकुण ०४ कोटी ०९ लाख ३९ हजार ६२७ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

https://sai.org.in/


तसेच या व्‍यतिरिक्‍त उत्‍सवकाळात सशुल्‍क व ऑनलाईन पासेस व्‍दारे एकुण ६१ लाख ४३ हजार ८०० रुपये देणगी प्राप्‍त झाली. तसेच श्री साईप्रसादालयात उत्‍सवकाळात १,८५,४१३ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर ३२,५३० साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच ३२,५०० तीन नगाचे लाडु पाकीटे व ३,३९,५९० एक नगाचे लाडु पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे ४२ लाख ०८ हजार ४०० रुपये प्राप्‍त झाले आहे. तर १,१६,००० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.
तसेच श्री रामनवमी उत्‍सवकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे ४३,४२४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात ५,९५४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अशी एकुण ४९,३७८ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असल्‍याचे जाधव यांनी सांगितले.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *