कॉलेजला जाता , तुम्ही या फी माफीत आहात का ?
महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. यातल्याच शिक्षणसाठीच्या योजना आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. याबाबत शासनाचे नियम ,अटीची माहिती ही teatimenews च्या वाचकांना असावी यासाठी ही बातमी लिहिली आहे.
राज्य सरकारने विभिन्न आर्थिक स्तरातील विद्यार्थी यांना प्रवेश घेताना खाजगी तसेच शासकीय शिक्षण संस्थेने फी वसूली करू नये म्हणून शासन आदेश पारित केला आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवग (SEBC) व
इतर मागास (OBC) प्रवगातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांचेकडून प्रवेशाचे वेळी शैक्षणिक संस्थांनी शिक्षण शुल्क न घेण्याचे आदेश दिले आहे. सरकारच्या या आदेशाने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांचे सोबत पालकांची चिंता कमी होणार आहे.
हा आदेश पारित होईपर्यंत फक्त पन्नास टक्के रक्कम परतावा मिळत होता. तो शिक्षण व परीक्षा शुल्क हे शंभर टक्के माफ करण्यात आले आहे. याचा शासन आदेश या बातमी सोबत जोडला आहे.