नारी शक्तीचा सन्मान …
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे नागरे प्रतिष्ठान वतीने कोपरगाव भुषण, माजी नगराध्यक्ष. पद्मकांतजी कुदळे आणि नारी शक्ती, धनश्री पतसंस्था चेअरमन सौ. शिलाताई पद्मकांतजी कुदळे यांना शिक्षण, शेती,सहकार,राजकिय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा. जीवन गौरव पुरस्कार . महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री.बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते आणि विश्वभारती रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कांतीलालजी अग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली गौरवपुर्वक प्रदान करण्यात आला आहे.
या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त संजय नागरे, मनोजशेठ अग्रवाल, आकाश नागरे, आनंद दगडे,.दिनार कुदळे यांचे सह रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कुदळे परिवार, कोपरगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
