‘सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर…
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती परिक्षण समिती प्रमुख सौ. कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे.
सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद ,बाल रंगभूमी परिषद,अहिल्यानगर,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म, एच.एम.राजपाल, सुमंगल प्लायवुड, कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार १२ व्या वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात शनिवार दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी पारंपारिक, निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक विषय, भौमितिक आकार,व्यंगचित्र असे सहा विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धकांनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) साक्षी लोहकणे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) श्रावणी जोशी, नेहा बोरुडे, ज्योती जगदाळे, प्रणाली आहेर, ज्योती आहेर, गायत्री थोरात, साक्षी मतकर, आदिती मैले, कस्तुरी गवळी, निकिता पन्हाळे, पुष्पा खोसे, आदित्य घोरपडे, विद्या खर्डेकर, अर्चना गुंडे, सुचेता घुमरे, रेणुका निळेकर, दिव्या बाविस्कर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) श्रृती कानडे , विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) सुहासिनी श्रीमाळी, चैताली सपकाळ, प्रांजल रोकडे, मनस्वी निकुंभ, किर्ती वाणी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.