श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या नेमलेल्या समितीची मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.

या नव्या धोरणानी भविकातील भेदभावाची भावना वाढीस घालण्यात आल्याचे उघड होत आहे. देवाचे दारीही आता श्रीमंतांचे चोचले पुरविण्यात येणार आहे. अशा वेळी सामान्य भाविकांनी आता शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला येवू नये का ? हा प्रश्न सामान्य साई भक्तांना पडला आहे. तर स्थानिक भाविक असे निर्णय न्यायालयाची समिति कसे घेवू शकते असा सवाल करीत आहे. मुळात साईबाबा संस्थान आज मितीला भाविकासाठी बऱ्याच चांगल्या सुविधा देत आहे. त्यातून निवास,भोजनप्रसाद या सुविधा या अत्यंत उत्तम आहे. याचा भाविकांच्या भक्तीच्या मार्गात भेदभाव निर्माण होण्यावर किंवा वाढीस लागण्याला कुठला वाव नाही. असे असताना थेट भक्त आणि त्यांचे आराध्य असलेल्या साईबाबांच्या दर्शन व्यवस्थेत इतक्या व्यावसायिक व खालच्या स्तरचा भेदभाव रुजवला जाणे हे चुकीचे आहे.

हा निर्णय जाहीर करताना मा उच्च न्यायालयाच्या समितीने सामान्य भाविकांना दिला जाणाऱ्या मोफत भोजन प्रसाद देताना स्थानिक राजकारण्यांच्या सांगण्यावर तर्कशून्य नियम अटी लादल्याने परिसरातून शिर्डीत रोजगारासाठी येणारे , परिसरातील महाविद्यालयाचे गोरगरीब विद्यार्थी यांच्या उपासमारीवर काय उपाय केला याची कबुली मा उच्च न्यायालयात दिली का ? अर्थात हा प्रकार उच्चस्तरीय चौकशीचा भाग आहे.

भाविकांना सुविधाच द्यावायच्या आहेत तर शिर्डी , पुणतांबा रेल्वे स्थानकावर दिवसभर सईबाबाच्या मोफत बस सेवा का पुरवत नाही ? यासोबतच परिसरात असलेले संत श्री जंगलीमहाराज आश्रम ,संत श्री जनार्धन स्वामी मंदिर , श्रीशुक्राचार्य मंदिर ,संत श्री चांगदेव महाराज समाधी , संत श्री गंगागिरी महाराज मठ सारला बेट ,संत श्री उपासणी महाराज मठ या धार्मिक स्थळावर ना नफा न तोटा बस सेवा पुरवावी.


या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्‍थान मार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्‍सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा — विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्‍हणून शाल व फोटो, साई चरित्र, उदी- लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादी दिल्या जाणार आहेत. या धोरणामुळे साईभक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे.


देणगीदार साईभक्‍तास एका वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती पास दिला जाईल तसेच ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ लाडु प्रसाद पॅकेट दिले जातील.


देणगीदार साईभक्‍तास दान करते वेळी दोन वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती / दर्शन पास दिला जाईल. तसेच, एक 3D पॉकेट फोटो, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, २ लाडु प्रसाद पॅकेट्स दिले जातील.


देणगीदार साईभक्‍तास दान करते वेळी कुटुंबातील ५ सदस्यांसाठी दोन VVIP आरती पास दिले जातील. त्याचबरोबर एक 3D पॉकेट फोटो, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, २ लाडु प्रसाद पॅकेट्स दिले जातील.


देणगीदार साईभक्‍तांस त्‍यांनी दान केलेल्‍या वर्षामध्‍ये २ VVIP आरती पास मिळतील तसेच नंतरच्‍या वर्षामध्‍ये त्‍यांनी केलेल्‍या दानाप्रमाणे प्रति वर्ष १ VVIP आरती पास मिळेल. (उदाहरणार्थ, पाच लाख रुपयांच्या दानासाठी, पहिल्‍या वर्षी २ VVIP पास मिळतील नंतरच्‍या चार वर्षासाठी प्रत्‍येक वर्षी १ VVIP पास मिळेल). त्‍यांना गेट नं. ६ किंवा त्या वेळी कार्यरत असलेल्या सशुल्‍क दर्शन रांगेतून कुटुंबाच्या ५ सदस्यांसाठी तहहयात वर्षातुन १ वेळेस मोफत दर्शन सुविधा दिली जाईल तसेच, साईभक्‍तास देणगी दिल्‍यानंतर एक वेळेस बहुमान म्‍हणुन, १ सन्‍मान शॉल, १ 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, १ 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ३ लाडू प्रसाद पॅकेट्स आणि कुटुंबातील ५ सदस्यांसाठी मोफत VIP प्रसाद भोजन पास दिले जातील.


 देणगीदार साईभक्‍तास त्‍यांनी देणगी दिलेल्‍या प्रमाणात प्रत्येक वर्षी २ VVIP आरती पास मिळतील, (उदाहरणार्थ, ३० लाख रुपयांच्या दानासाठी, ३० वर्षांसाठी प्रति वर्ष २ VVIP पास मिळतील).
 देणगीदार साईभक्‍ताचे कुटुंबातील ५ सदस्यांना तहहयात वर्षातून एक वेळेस मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल.
 देणगीदार साईभक्‍तास वर्षात एक वेळेस श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्‍यासाठी वस्‍त्र देण्‍याची संधी दिली जाईल. (उदा. प्रत्येक रु.१० लाख दानासाठी एकवेळेस वस्‍त्र परिधान करण्‍यासाठी वस्‍त्र देण्‍याची संधी मिळेल (उदाहरणार्थ, ३० लाख रुपयांच्या दानासाठी देणगीदारास ३ वर्षे वस्त्र देण्‍याची संधी मिळेल).
 देणगीदार साईभक्‍तास दान करतेवळी एक वेळेस श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र भेट म्‍हणून दिले जाईल.
 देणगीदार साईभक्‍तांस दान करतेवेळी बहुमान म्‍हणून , १ सन्‍मान शॉल, १ श्री साईंची मूर्ती, 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ५ लाडू प्रसाद पॅकेट्स, कुटुंबातील ५ सदस्यांसाठी मोफत VIP प्रसाद भोजन पास मिळेल.


 देणगीदार साईभक्‍तास तहहयात ५ सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष ३ VVIP आरती पास मिळतील.
 देणगीदार साईभक्‍तास श्री साईबाबांना परिधान करण्‍यासाठी वस्‍त्र देण्‍याची संधी दिली जाईल, (उदा. प्रत्‍येक रु.१० लाखच्या दानासाठी एक वस्त्र देण्‍याची संधी मिळेल ) ही वस्त्र देणगीदार साईभक्‍त आयुष्‍यभरात कधीही दान करू शकतात. त्‍याकरिता १ महिना पुर्वी कळविणे बधंनकारक राहील.
 देणगीदार साईभक्‍तांस दान करतेवेळी श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र (१ सेट)भेट म्‍हणून दिले जाईल.
 देणगीदार साईभक्‍तासह कुटूबांतील ५ सदस्‍यांना प्रत्येक वर्षी २ प्रोटोकॉल VVIP दर्शन पास मिळतील, ही सुविधा तहहयात लागू राहील.
 देणगीदार साईभक्‍तास बहुमान म्‍हणून, १ सन्‍मान शॉल, १ श्री साईंची मूर्ती, 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ५ लाडु प्रसाद पॅकेट्स, देणगीदार साईभक्‍ताच्‍या कुटुंबातील ५ सदस्‍यांना मोफत VIP प्रसाद भोजन पास मिळेल.

अशा भाविकात भेदभाव वाढीस घालणाऱ्या तूघलूकी निर्णयांचा विपरीत परिणाम हा शिर्डीच्या आर्थिक विकासावर नक्की होईल.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *