पुणतांबा परिसरातुन संदिप वर्पे यांना आघाडी देणार उबाठा सैनिक एकवटले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना.राष्ट्रवादी कॉग्रेस.राष्ट्रीय कॉग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप वर्पे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आज त्यांचे बंधु डॉ नचिकेत वर्पे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. मा वि आ उमेदवार संदीप वर्पे यांना राहाता तालुक्यातील अकरा गावातून आघाडी मिळवून देण्यासाठी शिवसैनिक एकवटले आहे.
या बैठकी नंतर संदिप वर्पे यांच्या प्रचारार्थ गावात मुख्य बाजारपेठ.नेहरुचौक. डोके गल्ली. राम गल्ली. संजयनगर भिलहाटी. इंदिरानगर.मल्हारचौक . आशा केंद्र.विक्रमचौक . स्टेशन रोड. घर टु घर तुतारी. कोपरगाव ते श्रीरामपूर रोडवरील विविध क्षेत्रातील सर्व छोटे मोठे दुकानदार .व्यापारी बंधु. यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना चिन्हाचे पत्रक देऊन तुतारी ला मतदान करण्यासाठी विनंती करण्यात आली असता.मतदारांनी उस्फुर्त पणे प्रोत्साहन दिले. तुतारी वाजवणारा मानुस हे चिन्ह पोहचवुन युवक बंधुंसह . माता भगिनी. यांनी. सर्व सामान्य माणुस निवडणून यावा असे बोलून दाखवले.

याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पवार.शंकरराव शेलार, युवासेनेचे किशोर गांगुर्डे, राहुल इंगळे.शैलेश गगे, प्रसाद जेजुरकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत डॉ नचिकेत वर्पे यांचेसह वैभव बोठे .मनिष चितळकर यांचा पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.