साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी…
सूर्यतेज संस्थेचा उपक्रम, ज्योती पतसंस्था व साईभक्तांचा सहभाग…
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या अभियानाला बी.एस.एन.एल.चे संचालक व ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अँड. रविकाका बोरावके,प्रसिध्द व्यापारी अजित शिंगी, सेवानिवृत्त नायब तहसिलदार खिंवराज दुशिंग,कोपरगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड. जयंत जोशी, सामाजिक कार्यकर्ते संदिप ठोके,वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ.संदिप मुरुमकर,सूर्यतेजचे आनंद टिळेकर,अनंत गोडसे,महेश थोरात,आकाशवाणीचे विजय कासलीवाल,सुनील गाडे,दिलीप गायकवाड,रणजित पंडोरे,राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी,विद्यार्थीनी,स्वच्छतादूत
पथक,महाराष्ट्र हरित सेना,यांचे सहकार्य लाभले आहे.

सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात अनेक उपक्रम राबविले आहे…यात सुमारे ५० हजार पेक्षा जास्त विविध झाडांचे मोफत वितरण आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे.
कोपरगांव ते शिर्डी या सोळा किमी महामार्गावर श्रीरामनवमी उत्सवानिमित विविध ठिकाणच्या अनेक साई पालखी पायी चालून मार्गस्थ होतात.या भाविकांना साईभक्तांकडून श्रध्देने खाद्य व पेय पदार्थ वाटप केले जाते.साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला कोपरगांव ते शिर्डी पवित्र मार्गावर स्वच्छता रथातून तात्पुरत्या स्वरूपाच्या सुमारे ३०० कचरापेटी सुमारे २८ केंद्रावर उपलब्ध करून देवून कचरापेटी द्वारे कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून मोफत कचरापेटी वाटप केली आहे.कचरापेटीवर ” आपण सारे साई भक्त साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला पालखी मार्ग स्वच्छ ठेवू या. ” या संदेशाबरोबर ओला,सुका,सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक आणि घातक कचरा वर्गीकरण या स्वच्छता प्रबोधन संदेश सोबत उन्हाच्या तिव्रतेमुळे व्याकूळ पक्षांना खाद्य आणि पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरितसेना वृक्षसंवर्धन,माझी वसुंधरा अभियान संदेश दिला आहे.
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून झालेल्या स्वच्छता अभियानात स्वच्छताप्रेमी यांचेसह साई स्वयंसेवकांच्या सहकार्याने साई पालखी रस्ता स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गेल्या आठ वर्षाच्या या अभियानामुळे साई पालखी रस्त्यावरुन शिर्डीत येणाऱ्या भाविकात स्वच्छतेविषयी जागृतता निर्माण झाली असून कचराचे ढिग आटोक्यात येवून सकारात्मक परिणाम दिसू लागले
आहे.स्वच्छता अभियानाचे साईभक्तांनी स्वागत केले असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे…