हल्ली आम्हाला अनेक चुकीच्या गोष्टी दिसतात. गेल्या आठवड्यात पुण्यातला एक विडिओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला. त्यात ट्राफिक पोलिस एक नागरिकाला पकडून त्याचा मोबाइल हिसकावत आहेत. व तो नागरिक हे मला मारत आहे. माझा फोन हिसकावत आहे म्हणून मदत मागत होता. अर्थात हा सर्व प्रकार स्थानिक नागरिक आपल्या मोबाइलने लाइव करत होता. त्यामुळे ही घटना लोकांसमोर आली.
अर्थात याचा राग येवून त्या पोलिसानी ज्याचा मोबाइल हिसकावत होते. त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जाई पर्यन्तची घटना सार्वजनिक आहे.पण पुढे काय झाले या बाबत माहिती नाही.
असो पोलिसांचे विडिओ सामान्य नागरिक काढू शकतात. ते लोकसेवकच आहे. असा स्पष्ट खुलासा अमितेश कुमार सिंग या आय पी एस अधिकाऱ्यानी केला आहे. आणि हा कायदेशीर अधिकार नागरिकाना आहे.
याच विडिओ करण्यावरून दाखल केलेल्या एक गुन्ह्यात न्यायालयाने दिलेला आदेश हा त्या पीडित नागरिकाच्या बाजूने दिलेला आहे. ज्यात संबंधित पोलिस कर्मचारी यास नुकसान भरपाई द्यावी लागलेली आहे. या निकालाची प्रत तुम्ही डाउनलोड करून घेवू शकता.