६५० ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

credit dio

६५० ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

शिर्डी लोकसभा निवडणुकीत ८५ वयापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेली व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. ७ मे ते ९ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या गृह मतदानात शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६५० मतदारांनी मतदान केले.

असे असूनही आज मतदानाच्या दिवशी हे चित्र का अनुभवला येते आहे ? याशिवाय थेट मतदान केंद्रात गाडी घेवून मतदार आजारी आहे , चलता येत नाही या कारणांनी येताना दिसले आहे.

१८ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान शिर्डी लोकसभेत होम वोटिंगसाठी ७०० मतदारांनी बीएलओकडे अर्ज केले होते. पहिल्या दिवशी ३०७ ज्येष्ठ नागरिक व ५७ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुसऱ्या दिवशी २४३ ज्येष्ठ नागरिक व ३९ दिव्यांग मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. आजच्या तिसऱ्या दिवशी ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान न झालेल्या ५० मतदारांपैकी १८ मतदार मयत आहेत‌. २२ मतदार घरी आढळून आले नाहीत. यातील बहुतेक मतदार रूग्णालयात दाखल आहेत‌. १० मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला.

विधानसभा मतदारसंघ अकोले – १३२, संगमनेर – १०२, शिर्डी – ११३, कोपरगाव – १११, श्रीरामपूर – ९६ व नेवासा -९६ असा ६५० मतदारांनी होम वोटींगद्वारे मतदानाचा हक्क बजावला. होम वोटिंगसाठी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष बूथ उभारण्यात आला होता. यासाठी पोलीस, दोन निवडणूक अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व कॅमेरामन अशी टीमची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे ‌.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *