नाट्यपरिषद, निवडणुकीत रंगकर्मीं नाटक समूहाच्या “नटराज पॅनलचा” दणदणीत विजय…

नाट्य परिषदेचे सतिश लोटके सर्वाधिक मतांनी विजयी…

नगर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठीची निवडणूक काल अहमदनगर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. ज्यामध्ये रंगकर्मीं नाटक समूहाच्या नटराज पॅनलचे तीनही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झालेे. नगर मधील अत्यंत अनुभवी असणारे आणी नाट्य परिषद,मध्यवर्ती, मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके यांच्या नेतृत्वाखाली नटराज पॅनलचे युवा रंगकर्मी क्षितिज झावरे, संगमनेर शाखेचे अध्यक्ष संजयकुमार दळवी व सतीश लोटके यांचा मोठ्या फरकाने निवडणुकीत विजय झाला. नगरच्या दादा चौधरी विद्यालयात तर शेवगाव , संगमनेर येथे रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. दि. १९ रोजी अधिकृत घोषणा प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी करणार आहेत. यावेळी नटराज पॅनलच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

निवडणूक जाहीर झाल्यापासून या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सुरवातीला ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले गेले होते परंतु एकमत होऊ शकले नाही. आणी अखेर १६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.
अहमदनगर जिल्ह्यामधून या निवडणुकीसाठी सतीश लोटके, क्षितिज झावरे, संगमनेरचे संजयकुमार दळवी, शशिकांत नजान, श्याम शिंदे , शेवगावचे उमेश घेवरीकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सतीश लोटके, झावरे , दळवी यांनी एकत्रित येत नटराज पॅनल या निवडणुकीसाठी उभे केले होते तर त्यांच्या विरोधात श्याम शिंदे व उमेश घेवरीकर यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले होते. तर शशिकांत नजान हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूकीस उभे होते. त्यामुळे या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली होती. पण नगरमधील सर्व मतदारांनी आणि कलाकारांनी या निवडणुकीत भरघोस मतदान करून नटराज पॅनलला एकतर्फी विजय मिळवून दिला. अहमदनगर शहर, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, शेवगाव या सर्व ठिकाणचे मिळून एकूण बाराशे मतदार या निवडणुकीसाठी पात्र होते. त्यापैकी ९८४ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सतीश लोटके यांना सर्वाधिक ७१३ मतं पडली तर, क्षितीज झावरे यांना ६५८ मते पडली तर तिसऱ्या क्रमांकावर संजयकुमार दळवी हे ५७० मते घेऊन निवडून आले. तर शाम शिंदे ३२३, शशिकांत नजान ३१७ , उमेश घेवरीकर ३०९ मते मिळाली.

credit : sushant

मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळालेले सतिश लोटके हे ३८ वर्षापासून रंगभूमीवर अविरतपणे कार्य करत असून अ. भा. मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सन २००३ साली अहमदनगर येथे संपन्न झालेल्या ८३ व्या नाट्य संमेलनाचे प्रमुख आयोजक म्हणून कार्य केले असून अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई येथे सहकार्यवाह काम पहात आहेत. कलाक्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन करून अनेक राज्यस्तरीय पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. तसेच क्षितिज झावरे हे २२ वर्षापासून नाट्य कलाकार म्हणून कार्यरत असून अभिनय, दिग्दर्शनाचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच रोटरी क्लब, अ’नगर मिडटाउनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कोवीडच्या काळात मोठे कार्य केले आहे. संजयकुमार दळवी हे ३५ वर्षापासून रंगभूमीवर सक्रिय असून त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पारितोषिक प्राप्त केले आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना म्हणून कामकाज त्यांनी केले आहे.
अभिनेते प्रशांत दामले यांच्या नेतृत्वात असलेल्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलचा एक भाग म्हणून नटराज पॅनल ने अहमदनगर मधून ही निवडणूक लढवली. यासाठी स्वतः प्रशांत दामले यांनी नगर मध्ये या तीनही उमेदवारांसाठी प्रचाराचे आयोजन केलं होते. त्यास मतदारांनी मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून अहमदनगरच्या नाट्य क्षेत्रात भरघोस कार्य करण्याचं आश्वासन या तीनही उमेदवारांनी दिले. नगरमध्ये नाट्यगृहाचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडवणं तसेच कलाकारांसाठी तालीम हॉल उपलब्ध करून देणे आणि नवीन कलाकारांसाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळांचा आयोजन करणे, वृध्द कलावंतांना मानधन यासारखी अनेक कामे करण्याचा निर्धार तीनही विजेत्यांनी केला आहे.
या निवडणुकीसाठी योगेश पवार यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. नगरची निवडणूक अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि नगर मधील सर्व मतदारांचे आभार, प्रचार प्रमुख पी. डी. कुलकर्णी व सतीश शिंगटे मानले आहेत.
या यशाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
नटराज पॅनलच्या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *