निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रम शाळा मंगरूळ खुर्द येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न
निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रम शाळा मंगरूळ खुर्द येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती माह निमित्ताने आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी ज्ञानेश्वर जाधव यांनी शाळा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या प्रयत्नाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिक अभ्यासाबाबत जादा तासिका सुरू कराव्यात अशी सूचना मांडली. वर्ग शिक्षक सुखदेव गावडे यांनी विद्यार्थ्यांबाबत पालकांना माहिती दिली. आणि राबवत असलेल्या उपक्रमाविषयी सांगितले. या कार्यक्रमासाठी आश्रम शाळेचे समन्वयक प्रा. अनिल जगताप यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने शाळा करत असलेल्या विविध बाबींची माहिती सांगितली.या कार्यक्रमासाठी योगेश केदार, ज्ञानेश्वर जाधव, महादेव हुलमेखे लक्ष्मण केदार, लक्ष्मण उगले, नानासाहेब गायकवाड, माणिक केदार सचिन पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन संजय बगाव यांनी केले.
ज्या गरीब आई वडिलांना कामासाठी गावोगाव फिरावं लागत अशा पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी याठिकाणी विनामूल्य सोय होते .
याकरिता तुम्ही संजय बगाव सरांशी संपर्क करू शकता .त्यांचा नंबर :+91 77579 16997