मध्य रात्री दोन हरनींची भटक्या कुत्र्यांनी केली शिकार
घटना सीसीटीव्हीत
पुणतांबा:(मधु ओझा) पुणतांबा येथील शाळेच्या पडवीत व प्रांगणात मध्य रात्री मोकाट कुत्र्यांनी दोन हरणाचा फडशा पाडला घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पुणतांबा येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या पडवीत व प्रांगणात आज सकाळी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील दोन मादी जातीचे हरीण मृत अवस्थेत आढळून आल्याने या परिसरात बिबट्या आल्याच्या शंकेने नागरिकांत सुलट सुलट चर्चेला उधाण आले होते.
पण शाळेच्या सीसीटीव्ही फुटेज मुळे सर्वच शक्यतांवर पडदा पडला.शाळेतील प्रांगणात व पडवीत काल मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान दोन हरीण आल्याने परिसरातील मोकाट कुत्र्यांनी या दोन हरियाणा घेरून त्यांच्यावर हल्ला करत दोन्ही हारणींची शिकार करून मारून टाकले. व अर्धवट खालेल्या अवस्थेत टाकून दिल्याने पडवीत यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याने विद्यार्थी व पालकांनी हे पाहण्यासाठी गर्दी केली होती या गर्दीतून उलटसुलट चर्चेला उधाण आले. होते शेवटी शाळेचे कर्मचारी आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पहिले असता. यादोन्ही हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून अर्धवट झालेल्या अवस्थेत सोडून दिले.या घटनेची माहिती राहाता वनपाल सानप याना फोन वरून शिवाजी थोरात यांनी माहिती देताच वनरक्षक साखरे हे घटनास्थळी येऊन सदर घटनेचा रीतसर पंचनामा करून पोस्टमार्टम साठी तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेले. सीसीटीव्ही फुटेज पहिल्या नंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
