वीज वितरणचा अजब उपाय , थेट झाडांच्या मुळावर घाव
नेमेची येतो .. या उक्ती प्रमाणे पावसाळा सुरू झाला की वीज वितरणचे त्यांच्या लाइन वरील झाडाच्या फांद्या तोडण्याचा उपाय केला जातो. अर्थात ही कामे पावसाळा सुरू होण्याआधी केली पाहिजे. पण सवयीचा भाग म्हणून ऐन पावसात रात्र रात्र भर वीज पुरवठा बंद करायचं. अन दिवस भर झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी म्हणून वीज पुरवठा खंडित करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा विभाग म्हणजे वीज वितरण .
आता मंजूर मिळत नाही म्हणून या विभागाने एक शक्कल लढवली आणि आपल्या वीज तारांच्या खाली येणारे झाडांच्या फांद्या ऐवजी सरळ झाडच तोंडायच. यासाठी जेसीबी लावायचा. कंत्राटी कर्मचारी नेमायचा अन जोरात झाडे तोंडायची. वास्तविक पाहता अनेकवेळा ती झाडे आधीपासून तिथे आहेत. असे असूनही त्यांच्या वरुन यांच्या वीज वाहक तारा घेऊन जायच्या , असे का होते तर . ठेकेदाराला काम दिल्या नंतर तो ते कसे करतोय हे आपल्या कार्यालयात बसून तपसायचे. पण यामुळे भविष्यात या तारांच्या खाली येणारे झाडांची कत्तल करायची. ही आपप्रवृत्ती वाढत चालली आहे.

हा प्रकार सर्रास सुरू आहे. फांद्या तोंडल्या जावू शकतात. पण थेट ते झाड पुनः जीवंत राहणार नाही अशापद्धतीने वीज वितरण काम करणार असेल तर या विभागाने आधी एकास दहा झाडे आधी लावावी. मग त्यांनी अशी मनमानी करावी हा एक मध्यम मार्ग आहे.
