उत्कर्षा रूपवते यांनी केले मतदान
शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी त्याचे मतदान केंद्रावर जावून सकाळी मतदानाच हक्क बजावला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्कर्षा रूपवते यांनी कॉँग्रेसला रामराम ठोकून वंचित कडून उमेदवारी मिळवली , त्यासोबतच महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या पक्षांच्या उमेदवार सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगलीच दमछाक करायला भाग पाडले आहे .
या उमेदवारांमुळे शिर्डी लोकसभेची निवडणूक ही तिरंगी झाली आहे. यामुळे या मतदार संघात मतदानाचा टक्का वाढायला पाहायला मिळू शकतो.

शिर्डी लोकसभा मतदार संघात 1 वाजे पर्यन्त सरासरी 30 टक्के मतदान पूर्ण झालेले होते. दुपारच्या उन्हाचा परिणाम हा मतदानावर होण्याची शक्यता आहे.