विज्ञानयुगात आत्म्याची भेट !
डॉ. कल्याण देवळाणकर हि एक वेगळी वनस्पती आहे.वास्तवात जगणारा ,विज्ञानांवर विश्वास असलेला, निसर्गाला परमेश्वर मानणारा माझा मित्र. मित्र म्हटलं कि , वयाची मर्यादा संपते. यांच्या कमी पाण्याची शेती व त्याला अनुसरून प्रबंध आहे. त्यांना पीएचडी मिळालेली आहे. पत्रकारिता पदवी मिळवलेली व सरकारी शेतकी शाळा मध्ये निरनिराळ्या शेती विषयक संशोधनात सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःला समर्पित केलेले देवळाणकर तसे श्री गुरुदत्तावर भक्ती पण अवडंबर नाही. व पु काळे यांचा फॅन अशी ओळख यामुळेच मी हि व पु काळेंचा भक्त झालो. व सामान्य माणसात परमेश्वर शोधू लागलो.
या देवळाणकर कुटुंबाने म्हणजेच दोघं उभयता व त्यांचा एक ग्रुप हे गेल्या वर्षी केरळला फिरायला गेले. हा वीस पंचवीस जणांचा म्हणजे दहा पंधरा सेवा निवृत्त जोडप्यांचा असा आहे. त्यानंतर दुबईला जाऊन आले. गेल्या महिन्यात ते त्यांच्या ट्रॅवल कंपनीने बद्रीनाथ ,केदारनाथ ,गंगोत्री ,जम्नोत्री अशी उत्तराखंडची तेरा दिवसाची यात्रा ठरवली. त्यानुसार द्विधा मनस्थितीत या नवराबायकोने यात जाण्याचे ठरवले. अर्थात यासाठी त्यांचा ट्रॅव्हल एजंट व मालक हे आग्रही होते. नाही हा म्हणत जाणे निश्चित झाले.

२६ मे ला औरंगाबाद येथून सचखंड एक्सप्रेसने यात्रा सुरु झाली. देवभूमी गुप्तकाशी पर्यंत सार काही आलबेल होत. एकूण २२ लोकांची हि सहल होती. पैकी चार जणांनी केदारनाथला जायचं नाही म्हणून ते इथेच थांबले. . आणि सुमारे तीस पस्तीस कि मी शिल्लक राहिलेली यात्रा विस्कटली. सहा जणांचे हेलिकॉप्टरचे तिकीट मिळाले. इतर दहा जणांनी घोड्यावरून जाण्यासाठी तयारी केली यात हे दोघे होते.पैकी चार घोडे हे नोंदलेला नाहीत या कारणांनी पोलिसांनि तिथेच अडवले. त्यांची यात्रा गौरी मठावर थांबली.
इथून पुढे जे झालं ते कुणाचाही बाबतीत घडू नये असं सार होत. उर्वरित सहा जण हे आपापल्या मार्गानी जायला निघाले. जवळ पास बारा तासाचा घोड्यावरचा प्रवास करून हे रात्री अकरा साडे अकराला केदारनाथला उतरले. तिथून तीन साडे तीन कि मी पायी प्रवास करायचा होता त्यांच्या नियोजित हॉटेल पर्यंतचा तो सुरु झाला. वातावरण अगदीच अपरिचित पाऊस सुरु , पूर्ण चढाचा प्रवास थंडी मी म्हणत होती. अशा परिस्थितीत संध्याबाईला हुडहुडी भरून आली. हातपाय ओढायला लागले. एकूणच जवळपास सोळा सतरा हजार फुटावर हि पायपीट सुरु होती. त्यामुळे या बाईसाहेबांचा ऑक्सिजन कमी झाला होता. जेमतेम अर्धा कि मी प्रवास पूर्ण झाला असेल. एका “पिट्टू “( पाठीवर बसून घेऊन जातात तो ) वाल्याला हॉटेल पर्यंत या बाईसाहेबाना सोडा म्हणून सौदेबाजी सुरु झाली. शेवटी एक हजार रुपयात ठरलं. पण त्यात बसता आले नाही म्हणून नाईलाज झाला.
हा अनुभव डोक्याला झिणझिण्या आणणारा होता .
नशीब चांगलं म्हणून रस्त्याच्या दुतर्फा तंबू टाकलेले होते.त्यातल्या एकाने येऊन हे वातावरण भयंकर आहे. तुम्हाला हॉटेल पर्यंत जाणे अशक्य आहे. तेव्हा रात्रभर इथेच काढा. म्हणून चारशे रुपये प्रतिमानसी रात्रभराच्या ठरले. पोरीला फोन करून सांगितले कि माझी तब्येत ठीक आहे, तुमच्या आईची तब्येत खराब झाली आहे.इतक बोलणं झालं अन फोन डिस्कनेक्ट झाला. बॅटरी संपली. ती हि एकाच वेळेला दोघांच्या फोनची अवस्था एक सारखी होती. यांच्या सोबत अन्य कुणी नव्हतं. सौ संध्याचा त्रास वाढत होता. जरा वेळाने एक पंचवीस ,सत्तावीस वर्षाचा तरुण तिथे आला. शेजारी काही अंतरावर त्याचा मोबाईल चार्जिंगला लावला व त्याने दोन ब्लॅंकेट संध्याच्या अंगावर पांघरले .या दरम्यान टेन्ट वाला आला त्याने देवळांकराकडून एक हजार रुपये घेऊन गेला त्यांना दोनशे रुपये परत केले. त्या मुलाकडे त्यांनी पैसे मागितले नाहि. तोंडावर पांघरून घेऊन झोपी गेला. देवळाणकर मात्र जागेच होते. जरा वेळाने त्याची हालचाल पाहून चौकशी केली. कुठला आहे ,काय करतो ? त्याचे उत्तर अगदी प्रामाणिक होते . झारखंड मधला आहे. मी काही करत नाही. पण इथून गेल्यावर लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सांगून तो झोपला. पहाटे लवकर उठला. त्याचा फोन वाजला नाही पण हा कुणाला तरी म्हणाला तुम्ही उठले असतात तर येतो अंघोळ करून निघू म्हणत तिथून निघून गेला. दवाखाना शोधला एक छोटे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन तिथल्या डॉकटरने दिलेली गोळी दिली. संध्याला इथेच झोपवून ते दर्शनाला गेले. तिथे दोन कि मी ची रांग बघून कळसाच दर्शन घेऊन माघारी फिरले. इकडे आले तर त्यांचा नेमका तंबू कोणता हे सापडेना. अर्धा तास संध्या, संध्या आवाज देऊन थकले आणि खाली बसले. सर्वस्व हरवल्याची जाणीव झाली. थोडं सावरत ज्या तंबू जवळ बसले होते त्याच दार लोटलं तर या बाईसाहेब शांत झोपलेल्या होत्या.अर्थात संध्या ग्लानीत असावी. तिला जागे केले झालेला प्रकार सांगितला आणि क्षणाचाही विलंब न करता खाली जाण्याचा निर्णय घेतला.















नवखे असल्याचा व मजबुरीचा फायदा उचलण्याची मानसिकता सर्वत्र एकसारखीच
रात्रभराच जागरण , चिंता , यामुळे देवळाणकर थकले होते. या बाईसाहेब आधीच क्षीण झाल्या होत्या . हे लक्ष्यात यायला तिथल्या “पिट्टू “ किंवा घोडेवाल्याला क्षणाचाही वेळ लागला नाही. संध्याच्या अशक्तपणामुळे या घोड्यावरून प्रवास करू शकत नव्हत्या. याचा फायदा पिट्टूवल्यानी घेतला. व थेट दहा हजार रुपये प्रतिमानसी घेऊ असा आग्रह धरला.नाईलाज होता. जिवंत घरी जाण्याची ओढ होती. हे सर्व गैर वाजवी ,अवास्तव आहे हे कळूनही वीस हजार देण्याची बोली ठरली. खिश्यात जेमतेम हजार दोन हजार रोख होते. त्यातले प्रवासात खाण्यासाठी ,पाण्यासाठी काही खर्च झाले. कसे तरी गौरी मठ गाठले. आता वीस हजार देण्याची वेळ होती. ट्रॅव्हल एजंट कडे रोख रक्कम नसल्याचे त्याने सांगितले. सर्व मार्ग थांबल्यावर त्या पिट्टूवाल्याच्या फोनवरून पोरीला फोन केला. ज्याच्या फोन पे वर हे पैसे मागवले त्याने हि संधी सोडली नाही थेट सहा टक्के त्याची फी आकारून याना अठरा हजार काही रुपये दिले. त्यात खिशातले पैसे टाकून वीस हजार करून त्या पिट्टूवाल्याला दिले. एकूणच फिरण्यासाठी तुमच्या मनाने नाही तर शरिराने साथ द्यावी लागते. याची अनुभूती झाली. नवख्या जागी आपली फसवणूक सहजपणे होते. हे सर्व योग्य असा प्लॅन न केल्याने घडते. हा अनुभव कधीही न विसरणारा आहे.
परतीच्या प्रवासाची तऱ्हाच न्यारी …
ट्रॅव्हल कंपनीच्या बोली नुसार दिल्ली ते औरंगाबाद ( संभाजीनगर ) हा विमान प्रवास बुक होता. त्याकरिता गौरी मठ ते दिल्ली एअर पोर्ट बुकिंग केलेल्या बसने आलो. बावीस जण एक नंबर टर्मिनल मध्ये गेले. काही वेळात विमानात बसायचं आणि दोन तासात संभाजी नगर हे मनात ठरत होत. तेव्हढ्यात उद्घोषणा झाली. संभाजीनगर फ्लाईट रद्द झाली. विमान सेवा पुरविणारे कंपनीने विमान रद्द झाले हे सांगून आपली जबाबदारी झटकली. त्यांनी आम्हाला पाणीही विचारले नाही. या व्यवस्था किती अमानवीय ,व्यावहारिक आहे हे समजून आपणही तस जगावं संवेदना शून्य अस वाटायला लागत. मनस्ताप सुरु . तिथे आणखी काही तोडगा निघतो का हे पाहण्यात वेळ गेला. भांडण्यात वेळ गेला . तेव्हा कुठे बारा तासांनी रात्री अकरा वाजेल पुण्याच्या फ्लाईटने पुण्यात जाण्याचे ठरले. तेरा दिवस नंतर मध्यरात्रि दोन वाजेल पुण्यात आले. अडचणी संपल्या नव्हत्या पण आपल्या प्रांतात आलो होतो. हे सुख काही वेगळंच होत.

सर्वच आजारी झाले , आपण एका आत्म्याच्या सोबत होतो याचा धक्का बसला .
पुण्यावरून घरी परतल्यावर आपल्या फॅमिली डॉक्टर कडे गेलो. त्यांचे बोलणे खाल्ले व पाच दिवस औषध उपचार घेतले. पण अजूनही जाणवत होता. मग पाच दिवस ऍडमिट झाले . या दरम्यान केरळ ट्रिप मधली मैत्रीण फोन वर बोलत होती . इकडच्या सहलीचा अनुभव संध्याबाई सांगत होत्या, त्या टेन्ट मध्ये राहिल्याचा विषय सांगताच मैत्रीण म्हणाली कि तुमच्या टेन्ट मध्ये एक मुलगा आला . त्याने अंगावर पांघरून घातलं . तो छत्तीसगड मध्ये राहणार होता. हे ऐकल्यावर या दोघांना नवल वाटलं कि हे सर्व आम्ही अजून कुणाला सांगितलं नाही मग याना कस कळलं ? त्यावर समोरून झालेला खुलासा ऐकून या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने जी ओळख सांगितली व अनेकांना त्याने त्याचा नंबरही दिला आहे. तो नंबर त्याच्या आई वडिलांकडे लागतो. हा मुलगा ऑक्सिजन कमी झाल्याने तीन चार वर्षांपूर्वीच तिथेच मरण पावला असल्याचं समजलं. या विज्ञान युगातही या आत्म्याने आपल्यासोबत रात्र घालवली हा अनुभव डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. पुन्हा एकदा त्या घटना क्रमात गेलं कि लक्ष्यात आल , टेन्टवाल्याने आपल्याकडून एक हजार रुपये घेतले ,दोनशे परत दिले तेव्ह या मुलाकडून पैसे घेतले नाही. म्हणजे तो त्याला तिथे दिसत नव्हता बहुदा , नशीब चांगलं यांचे फोन बंद पडलेले नव्हते. ते सुरु असते . जर त्याच्या सोबत फोटो घेतला अन तो त्यात दिसला नसता तर हे दोघे तिथेच हार्ट अटॅक येऊन इहलोकी गेले असते. सकाळी त्याचा फोन ना वाजताच तो बोलायला लागला व एकदां उठून निघून गेला हे सार काही वेगळंच होत. हे आता मनाने मान्य केलय .
या सहलीतून आलेला अनुभव काही गोष्टी शिकवून गेला.
त्यात मुख्य म्हणजे मनाने तयारी असून चालत नाही . शरीराने स्वस्थ असावे लागते. दुसरं म्हणजे या ठिकाणी जाताना आपल्यासोबत किमान एखादे पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर , एखाद ड्रायर ज्यातून उष्णता बाहेर पडते ते सोबत असणे गरजेचे आहे.जिथे जातो तिथल्या दळणवळणाचे दर ,संबंधित ठिकाणाचे दवाखाने ,पोलीस ठाणे यांची माहिती सोबत असायला पाहिजे .