छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

पुरस्कार स्वीकारताना संरपच डॉ. धनंजय धनवटे, जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी , ॲड.चांगदेवकाका धनवटे, छगनजी जोगदंड ,संतोष जोगदंड ग्रा. रोज. सेवक, विनोद धनवटे पाणलोट सचिव, माजी उपसरपंच योगेश घाटकर, ग्राम पंचायत सदस्य शैलेश कुलकर्णी, शिव स्मा. समितीचे अध्यक्ष दत्ता धनवटे, पोपटराव पवार, राजेंद्र थोरात संचालक गणेश स.सा.का, ललीत शिंदे, भुषण वाघ,नितीन भगत आदी मान्यवर उपस्थित होते

राज्य सरकार वन विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार पुणतांबा रस्तापूर गावाला वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण दि. 26मार्च 2023 रोजी दुपारी पुणे येथील यशदा यासंस्थेत करण्यात आले.
पुणतांबा रस्तापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक वृक्ष लागवड करुन सदर वृक्ष जगविण्यासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल नाशिक विभागात प्रथम क्रमांक व राज्य स्तरीय दुसरा क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने पुणतांबा रस्तापूर ग्रामपंचायतीला सम्मानित करण्यात आले
डॉ. धनंजय धनवटे यांची पहिली प्रतिक्रिया :
समस्त ग्रामस्थ पुणतांबा रस्तापूर यांच्या अथक परिश्रम ,यामुळे पुणतांबा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांना,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व महिला भगिनी ज्यानी अथक परिश्रम घेतले, सर्वांना समर्पित. सर्वांचे मनापासून अभिनंदन .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *