” म.फु.कृ.विद्यापीठाने विकसित केलेले खरिप पिकांचे वाण “
पश्चिम /उत्तर महाराष्ट्रात खरिप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन,भुईमूग, ज्वारी,बाजरी,तूर,मका,सूर्यफूल, इ.पिकांची लागवड केली जाते. धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात बीटी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बीटी कापूस वगळता वरिल पिकांचे म.फु.कृ.विद्यापीठाने विकसित केलेले वाण शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी आजच्या भागात देत आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी विद्यापीठाच्या वाणाची खरेदी करून आपल्या शेतात लागवड करावी.
सोयाबीन : फुले दुर्वा (KDS 992), फुले किमया (KDS 753), फुले संगम (KDS726)व फुले कल्याणी (DS 228)
भुईमूग : फुले प्रगती (JL24), फुले उन्नती, फुले मोरणा (KDG123) व फुले वारणा (KDG 128)
खरिप ज्वारी: सुधारित वाण – एसपीव्ही462 सीएसव्ही 13 /15/17/20/23/27/28
संकरित वाण – फुले वसुंधरा (गोड ज्वारी)
बाजरी : सुधारित वाण – धनशक्ती
संकरित वाण – फुले आदिशक्ती व फुले महाशक्ती
तूर : विपुला, फुले राजेश्वरी, गोदावरी व भीमा
मका : संकरित वाण – संगम, कुबेर, राजर्षी, महर्षी व महाराजा
सूर्यफूल : सुधारित वाण – फुले भास्कर, मार्डेन व भानू
संकरितवाण – फुले रविराज व केबीएसएच- 1/44