साई आरतीतला व्हीआयपी आणि गरीब भेदभाव संपवण्याचा प्रयत्न
श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्याह्न, धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ मध्याह्न आरतीवेळी करण्यात आला, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झांसी येथील मनीष रजक आणि पूजा रजक या साईभक्त दांपत्याला हा मान मिळाला. या साईभक्तांचा सन्मान श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्तांच्या समवेत करण्यात आला.
ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते, ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीत अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हा उपक्रम भक्तांच्या भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

अनेक वेळा टीका होवूनही साईबाबा संस्थानातील गरीब श्रीमंत हा भेदभाव कायम दिसून आलेला आहे. अनेकदा तर ” सो कॉल्ड ” वीआयपी हे आरतीला अगदी समाधी समोर उभे राहतात. या ठिकाणी सरकारी वीआयपी आणि वशिला आहे. त्यांना आरतीला उभे राहण्याची संधि मिळते. परिणामी सरकारी हुद्यावर असलेले भक्त आपल्या पुढे कुणाला उभे केले असा सवालही करतात.
असो देर आये दुरुस्त आहे, या उक्ती प्रमाणे या समितीने आज नूतन वर्षाला सामान्य भाविक परिवाराला या वी आय पी सोबत दर्शनाला उभे करून गरीब श्रीमंत हा भेदभाव संपवण्याचा जो प्रयोग केला आहे. त्याच कौतुक होणे स्वाभाविक आहे.